www.24taas.com, झी मीडिया,ठाणे
ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विना परवानगी आंदोलन केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्यावरुन राजकीय पक्ष आंदोलनाच्या आखाड्यात उतरल्याचं चित्र आहे. ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींसाठी क्लस्टर डेव्हलपमेंन्टच्या मागणीसाठी राजकारण तापू लागलं आहे.क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी शिवसेनेनं गुरुवारी लाँगमार्च काढल्यानंतर आता आज मनसे आणि राष्ट्रवादीनं आंदोलन पुकारलं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटवर आज मनसे ठाणे ते मंत्रालय असा मोर्चा काढणार आहेत.
या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही. मात्र मनसे मोर्चा काढण्यावर ठाम आहे. तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार जितेंद्र आव्हाड आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी शिवसेनेनं आंदोलन करत या दोन्ही पक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
महिन्याभरात योजना जाहीर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. काल मुख्यमंत्र्यांनी या महिनाभरात योजना जाहीर करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी शायनिंगसाठी राजकारण जोरात सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.