www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
चिल्ड्रेन टेक सेंटर ठाणे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेनं विकसित केलाय एक अनोखा आकाश कंदील. जो चक्क बोलतो. विशेष म्हणजे सौर उर्जेवर चालत असल्यामुळे तो विजेचीही बचत करतो.
विश्वास नाही बसत ना पण हे खरे आहे... चला तर पाहुयात कसा आहे ठाण्यातल्या चिमुरड्यांनी बनवलेला हा बोलका कंदील. यंदा ठाण्यातल्या चिल्ड्रेन टेक सेंटर्समध्ये काही चिमुरडे हात हे कंदील बनवण्यात मग्न आहेत. हे आहेत बोलके कंदील. संपूर्ण भारतीय बनावटीचे रोबोटीक कंदील आहेत.
रोबोट सारखा दिसणारा सोलर पावर वर चालणारा संपूर्ण तहा भारतीय बनवितेचा इको -फ्रेंडली आकाश कंदील जो बोलतो. विशेष रोबोटीक शैलीत सर्वाना दीपावलीच्या सुभेच्या देखील देतो. या रोबटीक कान्दिलात एक विशिष्ट प्रकारची व्हीईस रेकॉर्डिंग आय सी वापरण्यात आलीये.. जीच्यात संगणकाच्या सहायाने आवाज रेकॉर्ड करण्यात आलंय. हा आवाज प्ले होण्यासाठी यात छोटं सेन्सर वापरण्यात आलंय इतकच नाही तर कान्दिलामध्ये इलेक्ट्रिकसिटी तयार करण्यासाठी सोलर पॅनल वापरण्यात आलाय.
प्रकाशासाठी वापरलेत रंगिबेरंगी एलईडी लाईट्स त्यामुळे वीजेची बचत होतीये... कंदील बनवण्यासाठी कागदाचा वापर करण्यात आलाय त्यामुळं हा रोबोटीक कंदील इकोफ्रेंडलीही आहे. सध्या बाजारात चानया कंदिलांचं प्रमाण वाढत चाललंय यावर तोडगा काढण्यासाठी या चिमुरड्यांनी हा अगदी स्वस्त असा स्वदेशी कंदील बनवलाय. यंदाची दिवाळी ही स्वदेशी आणि इकोफ्रेंडली व्हावी हीच यामागची खरी धडपड.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ