www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राचा मंगलकलश आणलेले नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. मंगळवारी या जन्मशताब्दी कार्यक्रमाची सांगता झाली तीही वादातच...
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं सरकारनं या सोहळ्यासाठी १०० कोटी रुपयांची योजना सरकारनं आखली होती. मात्र, हे पैसे खर्चच झाला नसल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजी केली. विधिमंडळ परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ही घोषणाबाजी करण्यात आली.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधकांना सामोरे गेले. वर्षभरात विविध कार्यक्रमांवर मोठा खर्च झाल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी विरोधकांसमोर केला. यावेळी याचा खर्च तातडीनं द्या, अशी मागणीही विरोधकांनी केली.