मुंबई : अनेकांना ऑफिसमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे याची समज नसते किंवा ते त्याकडे दुर्लक्ष करतात.
अनावधानाने काही लोक अशी कपडे परिधान करतात, ज्याची ऑफिसमध्ये खिल्ली उडविली जाते. या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा, जेणेकरुन तुम्ही सर्वात उठून आणि स्टायलिशही दिसाल.
ऑफिसमध्ये नेहमी लेलेस्ट फॅशनच्या कपड्यांचा वापर करा. मात्र याचा वापर करताना या गोष्टींकडे जरुर लक्ष द्या की, ते तुम्हाला खूपच भडक दिसत नाही ना. हे तुमच्या सौंदर्याला बाधक ठरेल. यामुळे सूट होणारे आणि आरामदायक असे कपडे ऑफिससाठी निवडा.
लाईनिंगचे कपड्यावर तुम्ही स्लिम दिसता, यामुळे अशा कपड्यांची निवड करा. तुम्ही जरा मोठे असाल तर या प्रिंटचे कपडे वापरू शकतात. यामुळे तुमचा लूक परफेक्ट आणि स्टायलिश दिसेल.
ऑफिससाठी कपडे निवडताना तुम्ही ऑफिसमधील तसेच आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करुनच खरेदी करा. तेथील इंटेरिअर कसे आहे. तेथील लोक कसे आहेत, तेथे तुमची प्रतिमा चांगली राहण्यासाठी कशा कपड्यांचा वापर करणे योग्य राहील. या सर्व गोष्टींचा विचार करुन घ्या.
असे फॉर्मल कपडे वापरा, ज्यामध्ये तुम्हाला कंफर्टेबल वाटेल. स्टायलिश वाटण्यासाठी अशा कपड्याचा वापर करू नका, ज्याची खिल्ली उडविली जाईल.
ऑफिससाठी ब्लू, ब्राऊन, व्हाईट आणि ब्लॅक या रंगाचा वापर करा. हे रंग ऑफिसमध्ये तुम्हाला अधिकच स्मार्ट बनवतील.