मुंबई : आता अनेक ठिकाणी फ्री वायफाय सुरू झालेत. पण त्या पब्लिक वाय-फायचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
१. पब्लिक वाय-फायवर कधीही सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नका. यामुळे तुमच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस येऊ शकतो. यामुळे तुमची माहिती हॅक होऊ शकते. त्यामुळे कोणतेही सॉफ्टवेअर इंस्टॉल करणे टाळाच.
२. पब्लिक वाय-फायवर ऑनलाईन बँकिंगचा वापर करू नका. हे अतिशय असुरक्षित आहे. यामुळे तुमची माहिती हॅक होऊ शकते.
३. तुमच्या डिवाईसला सिक्योरिटी असायला हवी. यासाठी तुम्ही अँटीव्हायरस इंस्टॉल करू शकता. तसेच ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करू शकता.