मुंबई : नुकतंच अॅपलनं आपलं बहुचर्चित 'आय वॉच' लाँच केलं. मात्र ड्युप्लिकेट सामानांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण चीन मधील शेंजेनमध्ये आय वॉच सारखी हुबेहुब दिसणारी घड्याळं बाजारात विकण्यास सुरूवातही केली आहे.
शेंजेनमध्ये विकल्या जाणाऱ्या या घड्याळांची नावं 'यू वॉच' आणि 'डी वॉच' अशी आहेत.
शेंजेनमधील हॉकियांगबी मॉलमध्ये विकल्या जाणाऱ्या या घड्याळांची किंमत फक्त १८९०रू आहे. तर आय वॉचच्या सर्वात स्वस्त घड्याळाची किंमत 19 हजार रुपये आहे. या घडाळ्यावर अॅपलचा लोगो नाही पण दिसायला हे घड्याळ हुबेहुब अॅपलच्या वॉचसारखं आहे.
चीन मध्ये मिळणाऱ्या या घड्याळामध्ये कॉल करणं, मॅसेज करणं, म्युझिक या सुविधाही उपलब्ध आहेत. मात्र यामध्ये विचॅट यांसरखे मेसेंजिंग अॅप नाहीत. हे घड्याळ दिसण्यात अॅपल सारख असलं तरी तुलनेनं अॅपलच्या खूप मागे आहे, असं इथल्या विक्रेत्यांचं म्हणणं आहे.