www.24taas.com,
दक्षिण आफ्रिकेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या संशोधनातील प्रतिष्ठेच्या ‘यंग वूमन’ पुरस्कारासाठी एका भारतीय तरुणीची निवड झाली आहे. सरोजिनी नदार असं या तरुणीचं नाव आहे.
सरोजीनीला उत्कृष्ट संशोधनासाठी या पुरस्कारानं गौरविण्यात आलंय. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सरोजिनीने पीएचडी पदवी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिका सरकारच्या सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी खात्यातर्फे या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी सरोजिनीची निवड करण्यात आली आहे.
तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दक्षिण आफ्रिका सरकारतर्फे अशा प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. 40 वर्षांच्या आतील संशोधकांचीच यासाठी निवड करण्यात येते.