www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
क्लच नसलेली कारबद्दल तुम्ही फारसं ऐकलंही नसेल... पण, अशी एक कार कारकंपनी ‘मारुती सुझूकी’ लवकरच बाजारात आणणार आहे. क्लच नसलेल्या या कारमध्ये मॅन्युअल गिअर्स वापरण्यात आलेत. त्यामुळे या कारच्या फ्लुएल एफिशियन्सी आणि अॅव्हरेजमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
देशात ‘ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन’ (एएमटी)ची सुरुवात करणारी मारुती पहिली कंपनी ठरणार आहे. यामुळे स्मॉल-कार सेंगमेंटची प्रतिमाच बदण्याची चिन्हं आहेत. ही गाडी २०१४ च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाणार आहे. यामुळे ड्रायव्हर क्लचशिवाय गिअर बदलू शकणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीनं आपल्या या नव्या गाडीचं भारतात ‘सेलेरियो’ असं असेल. या पद्धतीच्या कारमध्ये क्लचचा तिसरा पॅडल नसेल आणि हायड्रॉलिक सिस्टमच्या साहाय्यानं ड्रायव्हर क्लचचा वापर केल्याशिवाय गिअर बदलू शकेल... त्यामुळे मायलेजमध्ये फारसा फरक पडणार नाही.
ही नवी गाडी रेग्युलर मॅन्युअली ऑपरेटेड कारपेक्षा थोडी महागडी असेल... पण, इतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारपेक्षा स्वस्त ठरेल. लग्जरी आणि सेडान कारमध्ये या गाडीला पसंती चांगलीच मिळतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.