'नोटाबंदी'नंतर चर्चेत आलेली सोनम गुप्ता नक्की आहे तरी कोण? पाहा...

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक चेहरे पडले. पण, कुणालाही न दिसणारा एक चेहरा मात्र सारखा समोर येत होता. तो म्हणजे सोनम गुप्ताचा... कोण आहे ही सोनम गुप्ता? आणि ती अचानक चर्चेत का आली? त्याच सोनमची जगभर रंगत गेलेली ही सोशल स्टोरी...

Updated: Nov 18, 2016, 11:23 AM IST
'नोटाबंदी'नंतर चर्चेत आलेली सोनम गुप्ता नक्की आहे तरी कोण? पाहा...     title=

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक चेहरे पडले. पण, कुणालाही न दिसणारा एक चेहरा मात्र सारखा समोर येत होता. तो म्हणजे सोनम गुप्ताचा... कोण आहे ही सोनम गुप्ता? आणि ती अचानक चर्चेत का आली? त्याच सोनमची जगभर रंगत गेलेली ही सोशल स्टोरी...


सौ. ट्विटर

सोशल मीडियाची लाडकी...

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक जगाला हादर बसले... बॅंकासमोर रांगा लागल्या... सोन्याला नवी झळाळी आली... पण या सगळ्यातही उजळून निघाला तो सोनम गुप्ताचा चेहरा... पण ही सोनम गुप्ता कोण? ती दिसते कशी? या प्रश्नांशी रांगात उभ्या राहिलेल्या सर्वसामान्यांना काहीच देणं घेणं नव्हतं... पण सोशल नेटवर्किंग आय़ुष्याचा अविभाज्य भाग झालेल्यांसाठी मात्र तो जीवनमरणाचा प्रश्न झाला. 

आणि सुरु झाला सोनम गुप्ताचा गुगल सर्च... पाहता पाहता तो इंटरनॅशनल ट्रेडही झाला... दोन हजारच्या नोटेवर ही सोनम गुप्ता प्रकटली आणि मग ही अस्वस्थता आणखी वाढली.

सोशल मीडियावरच्या या सोनम पुराणाची सुरुवात दहाच्या नोटेपासून झाली. 'सोनम गुप्ता बेवफा है' असं लिहून कुणीतरी आपल्या प्रेमाची 'खोटी नोट' खऱ्या दहाची नोटेवर लिहिली आणि सोनम दहा रुपयांत सुपरहिट झाली.

गुगल, फेसबुक, ट्विटर... याच सोनमच्या आशिकांनी न पाहिलेल्या सोनमचा शोध सुरु केला... आणि याच शोधात सर्च ट्रेंड सोनमला सुपरस्टार करत राहिला.


सौ. ट्विटर 

नोटेवरून जगाला कळलेली प्रेमकहाणी...

एका नोटीवरील या मेसेजने या कहाणीची सुरुवात झाली... 'सोनम गुप्ता बेवफा है'... १० रुपयाच्या नोटेवरचा शोध १० रुपयाच्या दुसऱ्या नोटेवरील उत्तराने लागला... 'मैं नहीं बेवफा, मैं नहीं बेवफा, सिर्फ तुम्हारी और तुम्हारी सोनम गुप्ता'... पुन्हा त्यावर उत्तर आलं तेही चक्क दोन हजारच्या नोटेवर... 'सोनम गुप्ता बेवफा है'...

सोनम थोडीच शांत राहणार... तीचं उत्तर आले तेही दोन हजारच्या नोटेवर... 'बेवफा तू है सोनवीर सिंह, मैं नही'

सोनमची आंतरराष्ट्रीय ख्याती

सोनवीर सिंहचे नाव समोर आलं आणि ही नवी प्रेमकहाणी समोर आली.. आणि मग या नोटेवरच्या सैराट प्रेमाने प्रांताच्या नाही तर जगाच्याच सीमा ओलांडल्या. एक हजारच्या जुन्या नोटेवरुन, एक डॉलरच्या नोटेवरुन, वीसच्या डॉलरवर, पाकिस्तानी नोटेवर... चिनी आणि एवढच काय तर पौंडाच्या नोटेवरही हा सोनम झळकू लागली... सोनम गुप्ताचा व्हायरल चेहराही सोशल मीडियात धुमाकूळ घालू लागला.

सोनम गुप्ताचा शोध अजूनही सुरुच आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून पैशापैशांवरुन सोनमचे प्रेम ठळक दिसतंय. प्रेमाची किंमत पैशांत तोलता येत नाही, असं म्हणतात.. पण ही सोनम-सोनवीरची प्रेमकहाणी म्हणजे फक्त पैशाचा खेळ आहे एवढं मात्र नक्की...