फेसबुकचा 'ग्रेट कमबॅक'!

Updated: Jun 26, 2014, 01:32 PM IST
फेसबुकचा 'ग्रेट कमबॅक'! title=

नवी दिल्लीः सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकनं यावर्षी ग्रेट असा कमबॅक केलाय. गेल्या वर्षी तरुणांची फेसबुकची आवड खूप कमी झाली होती. 

यावर्षीच्या फॉरेस्टर रिसर्चच्या अहवालानूसार, अमेरिकेतील 80% टक्के तरुण वर्ग अन्य साईटच्या तुलनेत फेसबुकवर जास्त कार्यक्षम आहे. या सर्व्हे मध्ये १२ ते १७ वयोगटातील ४,५१७ मुलांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील अर्ध्याहून अधिक मुलांनी सांगितलं की, ते फेसबुकवर गेल्यावर्षाहून यावर्षी जास्त कार्यक्षम आहेत आणि त्यात २८% टक्के मुलांचं उत्तर होते की, ते सर्व वेळ (दिवसांतून एक वेळ किंवा दिवसातील काही वेळ) फेसबुकवर कार्यक्षम राहतात. 

फोटो शेअरिग अॅप्लिकेशन इंस्टाग्राम फेसबुकनंतर खूप लोकप्रिय ठरलाय. त्यानंतर स्नॅपचॅट, ट्विटर, वाइन आणि व्हॉटसअॅप. व्हॉटसअॅप पेक्षा इंस्टाग्रामवर जास्त वेळ घालविला जातो आणि आता फेसबुकने इंस्टाग्रामला विकत घेतले आहे.  
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.