मुंबई : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने आपल्या पेजवर मुलगी मॅक्सचा फोटो शेअर केला आहे, मॅक्सला पोहणं शिकवताना हा फोटो आहे, फेसबुकवर याविषयी मार्कने लिहिलं आहे, हे आपल्या मुलींचं पहिल्यांदा पोहणं आहे, आणि ते आपल्याला आवडलंय.
मार्क आपल्या कुटुंबाचे फोटो फेसबुक पेजवर शेअर करत असतात. मार्कने मॅक्सचा जन्म झाल्यानंतर काही तासात पहिला फोटो शेअर केला होता.
मार्क झुकरबर्गने आपली मुलगी मॅक्सला, स्विमिंग टँकमध्ये दोन्ही हातांनी, पाण्याच्या पातळीच्या वर धरलं आहे. मॅक्सला थोडासा पाण्याचा स्पर्श होतोय, आणि मार्क आपल्या मुलीला प्रेमाने पाहतोय. मॅक्स आता दोन महिन्याची झाली आहे.