Moving Legs while Sitting Effects: अनेकजणांना बसल्या जागी शांत राहण्याची सवयच नसते. काहीतरी रेखाटत बसणं, नखं कुरतडणं, हातांचा चाळा करणं किंवा मग पाय हलवत बसणं. असा काही ना काही उद्योग सुरुच असतो. बऱ्याचदा पाय हलवताना घराती एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीनं पाहिलं, की आधी ते आपल्याला रागे भरतात. तेव्हा आपल्याला ते असं का करतात हेच कळत नाही. पण, त्यांच्या या रागे भरण्यामागेही एक महत्त्वाचं कारण आहे हे कळल्यानंतर मात्र आपणही हादरतो. कारण, बसल्या जागी पाय हलवण्यामुळे आपलंच नुकसान होत असतं....
- ज्योतिषशास्त्रानुसार बसल्या जागी पाय हलवण्याची सवय व्यक्तीला कंगाल बनवते. असं केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते, ज्यामुळं व्यक्तीची संपत्ती लयास जाते.
- एखादी पूजा किंवा अनुष्ठान करतेवेळी पाय हलवल्यास ती पूजाअर्चा फळत नाही.
- ज्योतिषविद्येत सांगितल्यानुसार बसल्या ठिकाणी पाय हलवल्यास धन लयास जाते. लक्ष्मीची अवकृपा होते.
- शास्त्रीय (Science) कारण सांगावं तर, पाय हलवल्यामुळे हृदविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते. अशा व्यक्तीला हृदयरोगाच्या समस्या भेडसावतात.
- वैद्यकिय क्षेत्रात (Medical) पाय हलवण्याच्या सवयीला 'रेस्टलेस लेग्स सिंड्रोम' (RLS) असं म्हणत त्यापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला जातो.
- बऱ्याचदा बसल्या जागी पाय हलवणाऱ्या व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास होतो.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भाच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )