Bhadrapad Amavasya 2023 : हिंदू पंचांगानुसार भाद्रपद अमावस्या 14 सप्टेंबर 2023 रोजी पाळण्यात येणार आहे. भाद्रपद अमावस्येलाच पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं. यंदा भाद्रपद अमावस्येला अतिशय शुभ असा अद्भूत असा योग जुळून आला आहे. त्या योगामुळे चार राशींचे नशिब सूर्यासारख चमकणार आहे. भाद्रपद अमावस्येच्या दिवशी साध्या, बुधादित्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र योग निर्माण होतो आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा अत्यंत शुभ असा योग आहे. त्यामुळे कुठल्या राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे जाणून घ्या. (bhadrapad amavasya 2023 and pithori amavasya September 14 auspicious yoga these zodiac sign get money )
या राशीच्या लोकांना भाद्रपद अमावस्येच्या दिवशी घडणाऱ्या दुर्मिळ योगायोगामुळे धनलाभ होणार आहे. त्याशिवाय प्रदीर्घ प्रलंबित कामं मार्गी लागणार असून त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. अनेक मार्गाने तुम्हाला धनलाभ होणार आहे. व्यवसायात वाढ होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी भाद्रपद अमावस्या फलदायी ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळणार आहे. पदासह आर्थिक फायदा होणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला दिलासा मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे फायदे होणार आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा ते फायदेशीर ठरणार आहे. यामुळे तुमच्या कुटुंबात कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.
भाद्रपद अमावस्येला घडणारा शुभ संयोग या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ या योगामुळे मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी चालू येणार आहे, इच्छित नोकरीसाठी तुमचा शोध पूर्ण होणार आहे. व्यावसायिक कामात आर्थिक लाभ होणार आहे.
अमावस्येपासून कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळणार असून तुमचं आत्मविश्वास वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहेत. यामुळे नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला देण्यात येणार आहे. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी नवीन डील त्यांना दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)