मेष - कामात व्यस्त राहाल. जबाबदारी वाढू शकते. व्यवसायात काही गोष्टी समजूतीने सोडवू शकाल. यश मिळेल. इतरांचा सल्ला फायदेशीर ठरेल.
वृषभ - गोष्टी हळूहळू सुधारतील. धीर ठेवा. प्रयत्न सुरु ठेवा. इनकम आणि खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल. मित्रांची मदत मिळेल.
मिथुन - चांगली बातमी मिळू शकते. मित्र, कुटुंबियांची मदत मिळेल. जवळच्या व्यक्तीकडे आपल्या मनातील गोष्ट बोलू शकता. तब्येत चांगली राहील.
कर्क - समस्या सोडवल्या जातील. कामासंबंधी चांगल्या कल्पना सुचतील, त्याचा फायदा होईल. नवीन लोकांशी ओळख होऊ शकते.
सिंह - मेहनतीच्या जोरावर कामं पूर्ण करा. मोठं टेन्शन कमी होऊ शकतं. नवीन गोष्टी शिकू शकता. संधी मिळाल्यास त्याचा फायदा करुन पुढे जा.
कन्या - जोडीदारासोबत वेळ घालवाल. समजूतीने अनेक समस्या मार्गी काढाल. गोंधळाच्या स्थितीत निर्णय घेऊ नका. विचार करुन पुढील निर्णय घ्या. सकारात्मक राहा.
तुळ - मित्रांसोबत वेळ घालवाल. गुंतवणूकीबाबत विचार कराल. दिवस चांगला आहे. धनलाभाची शक्यता आहे. दिवस आनंदात जाईल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - कामासाठी ओळखीच्या लोकांची मदत होईल. निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करा. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. इतरांचा विचार करुन स्वत:चं मत बदलू नका. आरोग्य चांगलं राहील.
धनु - उत्साही राहाल नवीन लोकांशी ओळख होईल. पुढील योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. दिवसभरातील कामं वेळेत पूर्ण होतील.
मकर - नवीन काम सुरु करण्यापूर्वी जुन्या कामाकडे लक्ष द्या. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. अतिआत्मविश्वासात राहू नका. कामं करताना काळजीपूर्वक करा.
कुंभ - कामाचा ताण असू शकतो. कुटुंबियांसोबत चांगला वेळ जाईल. जवळचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. दिवस आरामाचा आहे. तब्येत चांगली राहील.
मीन - कागदोपत्री कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. वाद होण्यापासून टाळा. सकारात्मक राहा. अधिक विचार करु नका. चांगली बातमी मिळू शकते. दिवस चांगला जाईल.