Horoscope 29 July 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान सहन करावं लागेल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

सुरभि जगदीश | Updated: Jul 28, 2023, 11:16 PM IST
Horoscope 29 July 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान सहन करावं लागेल! title=

Horoscope 29 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी नवीन लोकांशी संपर्क वाढेल. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. नोकरदार लोकांच्या कामावर वरिष्ठ खूप खूश होतील.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आज मित्रासोबत बाहेर प्रवास कराल. राजकारणात यश मिळेल. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत बळ येईल. अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. आज चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल.   

सिंह (Leo)

आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण आव्हानात्मक राहील. परस्पर भांडणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी सासरच्या लोकांकडून धनलाभ होईल. कौटुंबिक गरजांकडे लक्ष द्याल आणि जबाबदाऱ्या पार पाडाल

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना मानसिक तणाव वाढेल आणि तब्येत थोडीशी बिघडू शकते. तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी व्यावसायिकांनी गोंधळात कोणताही निर्णय घेणे टाळावे. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी व्यवसायात प्रगती दिसून येईल. उत्पन्न कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करा. धार्मिक सहलीतून मनामध्ये समाधान आणि आनंद राहील.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी एखाद्या मित्राकडून नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. व्यवसायासाठी अचानक केलेली सहल सकारात्मक परिणाम देईल. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी इतर कोणाशीही स्पर्धा करू नका. एखाद्या कामात अपयश आल्याने वाईट वाटेल. मित्रांकडून तुमचे नुकसान होऊ शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )