मुंबई : दिवाळी जवळ आली की, मित्रांना, आप्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या मेसेजेसची शोधाशोध सुरू होते. अशावेळी काहींना ते मिळतात किंवा काहींनी पाठवलेले फॉरवर्ड केले जातात.
त्यामुळे आम्ही तुमची ही समस्या सोडवण्यासाठी काही खास दिवाळी शुभेच्छापत्रे घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देऊ शकता.
पहिला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दीपावली!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करो,
शुभ दीपावली!
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी, मधूर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेऊन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत, फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दीपावलीचा सण आहे खूपच गोड. दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा..!