Holi Dahan 2023 Shubh Muhurat and Mantra: नवीन वर्षातील पहिला सण होळी आणि धुलीवंदन...हा सण संपूर्ण देशात मोठ्या थाट्यामाट्यात साजरा केला जातो. रंगाचा हा उत्सव आयुष्यातील नकारात्मक वृत्तीवर विजयाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह काही राज्यात होळी म्हणजे होलिका दहन हे 6 मार्चला होणार आहे. तर 7 मार्चला धुलीवंदन म्हणजे रंगांची उधळण (Holi 2023 Astro tips) होणार आहे. पूर्व उत्तर भारतात आणि काही राज्यात होलिका दहन हे 7 मार्चला होणार आहे. कारण भद्रा काळात होलिका दहन करणे अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात (Astro tips) होलिका दहनाच्या वेळी पूजा करताना ही मंत्र सांगण्यात आले आहेत. या मंत्रांचा जाप (Holika Dahan 2023 Mantra) केल्यावर समस्या दूर होतील. (Holi 2023 Mantra Puja Vidhi and holika dahan 2023 in marathi)
'अनेन अर्चनेन होलिकाधिष्ठातृदेवता प्रीयन्तां नमम्।।'
होलिका दहनाची पूजा करताना होलिकेला 3 वेळा प्रदक्षिणा करून जल अर्पण करताना या मंत्राचा जप करा.
ओम ह्रीं ह्रीं क्लिंम
आयुष्यातील शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिकाला गुलाल अर्पण करताना या मंत्राचा जप करा.
ऊं नृसिंहाय नम:
आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करण्यासाठी होलिकेला फळे, फुले, अक्षत आणि नारळ अर्पण करताना या मंत्रांचा जप करा.
'वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्राणा शंकरेण च। अतस्त्वं पाहि नो देवि विभूतिः भूतिदा भव।।'
हा मंत्र खास भस्म अंगाला लावताना म्हटलं गेला पाहिजे, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. होलिका भस्म अंगाला आणि नाभीला लावा. त्याशिवाय घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थोडे थोडे शिंपडताना हा मंत्र म्हणा. असं केल्यामुळे रोग दूर होतात, धनलाभ, ग्रहांचे अडथळे दूर होतात.
अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः।अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम् ॥
घरात सुख शांती राहावी म्हणून होलिकाची पूजा करताना या मंत्राचा जाप करा.
ऊँ प्रह्लादाय नमः
पौराणिकनुसार होलिका दहनामागे एक कथा आहे. भक्त प्रल्हाद यांची...त्यामुळे हा मंत्राचा जप केल्याने पुण्य लाभतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)