Festivals in September : सप्टेंबर महिन्यात जन्माष्टमी, गौरी - गपणती कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

September 2023 San Utsav In Marathi : सप्टेंबर महिन्यात अनेक सणांची रेलचेल आहे. जन्माष्टमी, ऋषि पंचमी, गणरायाचं आगमन, गौरीपासून पितृ पक्ष कधी आहे जाणून घ्या सणवार आणि त्यांचा तारखा.   

नेहा चौधरी | Updated: Sep 1, 2023, 07:47 AM IST
Festivals in September : सप्टेंबर महिन्यात जन्माष्टमी, गौरी - गपणती कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी  title=
janmashtami hartalika teej ganeshotsav rishi panchami pitru paksha ekadashi september 2023 festival calendar in marathi

September 2023 Festival Calendar In Marathi : सप्टेंबर महिन्याला (festivals in september 2023)सुरुवात झाली असून हा महिन्या भक्तीने न्हावून निघणार आहे. अख्ख महाराष्ट्र गणेशमय झालेलं असणार आहे. जन्माष्टमी (janmashtami 2023), ऋषि पंचमी, गणरायाचं आगमन (ganeshotsav 2023), गौरीपासून पितृ पक्ष (pitru paksha 2023) कुठल्या तारखेला आहेत. जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यातील सणवार...(janmashtami hartalika teej ganeshotsav rishi panchami pitru paksha ekadashi september 2023 festival calendar in marathi)

सप्टेंबर महिन्यातील सण वार 2023

रविवार 3 सप्टेंबर 2023 -  संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:23)
सोमवार 4 सप्टेंबर 2023 - श्रावणी सोमवार (शिवपूजन शिवामूठ- मूग)
मंगळवार 5 सप्टेंबर 2023 - मंगळागौरी पूजन आणि शिक्षक दिन
बुधवार 6 सप्टेंबर 2023 - कालाष्टमी, श्री कृष्ण जयंती आणि श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती
गुरुवार 7 सप्टेंबर 2023 - गोपाळकाला आणि राजे उमाजी नाईक जयंती
शुक्रवार 8 सप्टेंबर 2023 - जरा जिवंतिका पूजन
रविवार 10 सप्टेंबर 2023 - अजा एकादशी
सोमवार 11 सप्टेंबर 2023 - श्रावणी सोमवार (शिवपूजन शिवमूठ - जव)
मंगळवार 12 सप्टेंबर 2023 - मंगळागौरी पूजन आणि भौमप्रदोष 
बुधवार 13 सप्टेंबर 2023 - अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तारखेप्रमाणे),  शिवरात्री आणि अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री 04:48.
गुरुवार 14 सप्टेंबर 2023 - पोळा, दर्श अमावस्या, पिठोरी अमावस्या (मातृदिन)
शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 - जरा जिवंतिका पूजन आणि अमावस्या समाप्ती सकाळी 07:09.
शनिवार 16 सप्टेंबर 2023 - समश्रावणी
सोमवार 18 सप्टेंबर 2023 - हरतालिका तृतीया
मंगळवार 19 सप्टेंबर 2023 - श्री गणेश चतुर्थी 
बुधवार 20 सप्टेंबर 2023 - ऋषिपांचमी आणि गजानन महाराज पुण्यतिथी
गुरुवार 21 सप्टेंबर 2023 - जेष्ठागौरी आवाहन दुपारी 3:34 पर्यंत.
शुक्रवार 22 सप्टेंबर 2023 - जेष्ठागौरी पूजन.
शनिवार 23 सप्टेंबर 2023 - दुर्गाष्टमी, भागवत साप्ताहारंभ, जेष्ठागौरी विसर्जन (दुपारी 2:55 पर्यंत)
रविवार 24 सप्टेंबर 2023 - अदुःख नवमी
सोमवार 25 सप्टेंबर 2023 - परिवर्तीनि स्मार्त एकादशी
मंगळवार 26 सप्टेंबर 2023 - भागवत एकादशी.
बुधवार 27 सप्टेंबर 2023 -  प्रदोष व्रत
गुरुवार 28 सप्टेंबर 2023 - अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 06:49
शुक्रवार 29 सप्टेंबर 2023-  पितृपक्ष, भागवत सप्ताह समाप्ती आणि पौर्णिमा समाप्ती दुपारी 3:29