Shravan 2022: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. पण उत्तरेकडील राज्यात 15 दिवस आधी श्रावण सुरु होत असल्याने संभ्रम असतो. उत्तरेकडील राज्यात पौर्णिमा संपल्यानंतर नवा महिना सुरु होतो. तर महाराष्ट्रात अमावास्या संपल्यानंतर नवा महिना सुरु होतो. म्हणजेच शुक्ल पक्ष सुरु झाला की महिन्याला सुरुवात होते. हा पवित्र महिना शिव शंकरांना समर्पित असतो. श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार या दिवशी उपवास केला जातो. 28 जुलै 2022 ला असलेल्या अमवास्याला दीप पूजन केल्यानंतर 29 जुलै 2022 पासून श्रावण महिना सुरु होतो. श्रावण महिना 27 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
श्रावण महिना आणि सण
जे भाविक श्रावणी सोमवारचं व्रत करतात, त्यांनी पहाटे लवकर स्नान करून भगवान शिवाचे स्मरण करून संकल्प सोडावा. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. त्यानंतर शिवलिंगावर बेलची पाने, फुले, धोतरा इत्यादी अर्पण करा. धूप, दिवा आणि अगरबत्ती लावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. पूजेच्या शेवटी शिव चालीसा आणि शिव आरतीचे पठण करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)