राशीभविष्य | २४ नोव्हेंबर २०१९ | रविवार

कसा असेल तुमचा आजचा दिवस?  

Updated: Nov 24, 2019, 08:00 AM IST
राशीभविष्य | २४ नोव्हेंबर २०१९ | रविवार title=

मेष - कामाचं कौतुक होईल. एखादं काम संपवण्यासाठी अधिक धावपळ करावी लागेल. तब्येतीच्या समस्येसह काही खास गोष्टीबाबतही टेन्शन राहील. जुना आजार बळावेल. वायफळ कामांसाठी वेळ, पैसा खर्च होईल. सकारात्मक राहाल. 

वृषभ - तुमच्या काम आणि बोलण्याने लोकांवर प्रभाव पाडू शकाल. काही लोक तुमची मदत करतील. पैशांच्या बाबतीत स्वत:वर विश्वास ठेवा. लोकांनी केलेल्या मदतीमुळे फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मिथुन - नवीन संधी मिळू शकतात. बढती होऊ शकते. कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी इतर लोक तुमच्याशी सहमत असू शकतात. आत्मविश्वास वाढेल. 

कर्क - शांत आणि एकाग्रतेने काम कराल. गेल्या काही दिवसांपासून राहिलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या कामाने अधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. 

सिंह - कामाच्या ठिकाणी समस्या होऊ शकतात. समस्यांबाबत बेजबाबदारपणा करु नका. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. नवीन लोकांशी ओळखी होतील. 

कन्या - तुमच्या कामाकडे तसेच रोजगाराकडे लक्ष द्या. काम बदलण्याचा विचार मनात येईल. दररोजची कामं पूर्ण होतील. काम परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न कराल. वेळेत कामावर जाण्याचा प्रयत्न करा. कोणालाही तक्रार करण्याची संधी देऊ नका. नातेसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.

तुळ - जुन्या कामातून फायदा होईल. दररोजची कामं वेळेत पूर्ण होतील. व्यवसायात गुंतवणूकीमुळे फायदा होईल. जोडीदाराला वेळ द्या. जोडीदारासोबत पैसे आणि तब्येतीच्या बाबतीत चर्चा होईल. वैवाहिक आयुष्यासाठी दिवस चांगाला आहे. 

वृश्चिक - स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या. महत्त्वाच्या कामांसाठी केलेल्या योजनांमुळे पुढे फायदा होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. 

धनु - थकवा जाणवू शकतो. आराम करण्याचा प्रयत्न करा. खर्च करताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. पैसे कमावण्यासाठी काही चांगल्या संधी मिळतील. कुटुंबाच्या तसेच मुलांच्या गरजांवर लक्ष द्यावे लागेल. 

मकर - कामात मन लागणार नाही. चिंता करु नका. जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. भावनिक राहाल. अनेक कौटुंबिक गोष्टींवर मार्ग काढाल. कामं पूर्ण होतील. 

  

कुंभ - मित्रांसोबत एखाद्या गंभीर गोष्टीवर चर्चा होऊ शकते. पैशांच्या परिस्थितीवर विचार करा. कामात वाढ होईल. 

मीन - महत्त्वाची कामं पूर्ण करा.  तुम्ही विचार करत असलेली इच्छा पूर्ण होईल. कुटुंबाची साथ मिळेल. उत्साहात काम कराल तर फायदा होईल. खर्च वाढू शकतो.