Signs of the Arrival of Maa Lakshmi : हिंदू धर्मात देव देवतांच्या पूजापाठला विशेष महत्त्वं आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी देवी ही संपत्ती आणि समृद्धीची देवता मानली जाते. त्यामुळे ज्या घरावर किंवा ज्या व्यक्तीवर लक्ष्मी देवी प्रसन्न असेल त्यांच्यावर कायम पैशांची बरसात होतं असते. पण लक्ष्मी माता ही चंचल आहे, असं शास्त्रात म्हटलं गेलं आहे. त्यामुळे तिला कायम खूष ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा ती तुम्हाला क्षणात कंगाल करते. लक्ष्मी देवी कायम कोणाच्या घरी वास करत नाही. तिच्या आशीर्वादाचा वर्षाव ती तिच्या प्रत्येक भक्तावर कमी जास्त होतं असतो. पण जर लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार असेल तर तुमच्या घरात काही बदल होतात. घरात जर तुम्हाला 5 शुभ चिन्ह दिसल्यास समजा तुमचं नशीब उजळणार आहे. (Maa Lakshmi Arrival Signs If you see these 5 auspicious signs in the house, you will get a lot of money marathi news)
लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे घराची स्वच्छता. ज्या घरात कायम स्वच्छता असते तिथे लक्ष्मीची सदैव कृपा असते. त्यामुळे तुमचं घर कायम स्वच्छ असेल तर तुमला पैशांची चणचण कधी जाणवणार नाही.
शास्त्रात घुबडाला लक्ष्मीचं वाहन मानलं गेलं आहे. जर तुम्हाला घराच्या आजूबाजूला कुठेतरी घुबड दिसलं तर ते तुमच्या सौभाग्यासाठी भाग्यशाली आहे. लवकरच तुमच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे. मग अशावेळी लक्ष्मीमातेच्या स्वागताची तयारी करायला लागा.
शास्त्रानुसार शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. सकाळी उठल्याबरोबर शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून जा की लक्ष्मीमाता तुमच्या घराचा दरवाजा ठोकणार आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने आता तुमचं भाग्य उजळणार आहे.
शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, लक्ष्मीमातेला झाडू खूप प्रिय आहे. या झाडूच्या माध्यमातून घरातील सर्व घाण आणि धूळ साफ केली जाते. सकाळी जर तुम्हाला कोणीतरी झाडू मारताना दिसलं तर ते शुभ चिन्ह मानलं जातं. याचा अर्थ लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे.
असं म्हणतात की ज्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असतं, त्या घरातील सदस्यांचा आहार आपोआप बदलू लागतो. ही लोकं अचानक मांसाहार आणि सर्व प्रकारच्या नशेपासून दूर राहतात. त्यांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही त्यांना पुरेसं वाटतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)