मुंबई : आज मकरसंक्रांत आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला आहे. याचा परिणाम तुमच्या राशीवर देखील होणार आहे. आज सूर्य आणि शनीचं मिलन असा दुर्लभ योग तब्बल 29 वर्षांनंतर आला आहे.
मकर राशीतील शनि-सूर्य भेटीच्या या दुर्मीळ संयोगाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हा चांगला योग आहे आणि कोणत्या राशीसाठी हा अडचणीचा योग ठरणार आहे.
मेष (Aries): या राशीच्या लोकांनी वादविवाद टाळावेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वादामुळे नुकसान होऊ शकते. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेणे योग्य ठरू शकतं. विनाकारण आपलं मत मांडायला जाऊ नका.
वृषभ (Taurus): मोठे यश मिळवायचं असेल तर त्यासाठी नियोजन तयार करा. त्यावर काम करा आणि पुढे जा. प्रवासाचे योग आहेत मात्र विशेष काळजी घ्या. वडिलांसोबतच्या संभाषणात सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांना तुमच्या वागण्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
मिथुन (Gemini): या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. काम व्यवस्थित पार पडेल. तणाव टाळण्याकडे लक्ष केंद्रीत करा. व्यवसायिकांसाठी हा काळ चांगला आहे.
कर्क (Cancer) : कामामध्ये संतुलन ठेवणं फार गरजेचं आहे. कामाच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील. शांतपणे आणि संयमाने काम करा.
सिंह (Leo): नोकरी किंवा व्यवसायात उत्तम यश मिळणार आहे. रोग्याची विशेष काळजी घ्या. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या.
कन्या (Virgo): आताचा काळ चांगला नाही. त्यामुळे संयम ठेवा. व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कुठे फसणार नाही याची काळजी घ्या.
तुला (Libra): करियरसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. काही बदल होऊ शकतात जे भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक (Scorpio): वादविवाद होणार नाहीत याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. हुशारीनं काम करा.
धनु (Sagittarius): वाद घालणं टाळा, बोलताना विशेष काळजी घ्या. या परिस्थितीमुळे नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.
मकर (Capricorn): आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. योग्य निर्णय घेणे कठीण होईल. संयम बाळगणं फार महत्त्वाचं असणार आहे. सकारात्मक विचार ठेवा.
कुंभ (Aquarius): या राशीच्या लोकांसाठीचा काळ तणावपूर्ण असणार आहे. लक्ष केंद्रीत करण्यासाठी ध्यान धारणा करणं गरजेचं आहे. प्रवासाचा योग आहे.
मीन (Pisces): आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.बोलण्यात संयम ठेवावा. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नये. अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
(विशेष सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकं आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)