Mangal Vakri 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार आपली स्थिती बदलतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार येत्या 7 डिसेंबरला ग्रहांचा सेनापती मंगळ प्रतिगामी म्हणजे मंगळ वक्री स्थितीमध्ये जाणार आहे. मंगळ वक्रीमुळे काही राशीच्या लोकांसाठी धोका निर्माण असणार आहे. शास्त्रानुसार मंगळ सुमारे 80 दिवस प्रतिगामी गतीमध्ये असणार आहे. या काळात मंगळ कर्क राशीच्या सर्वात खालच्या राशीत असणार आहे. मंगळ ग्रह येत्या शनिवारी 7 डिसेंबर 2024 रोजी कर्क राशीत मागे जाणार असून 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत या राशीत राहणार आहे. मंगळाच्या प्रतिगामीपणामुळे कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे पाहूयात. (Mangal Vakri 2024 From 7th December these 3 zodiac signs mars transit negative effects )
मंगळाच्या प्रतिगामी स्थितीमुळे या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ सुरु होणार आहे. तुम्ही तुमच्या रागावर जितके जास्त नियंत्रण ठेवाल तितके चांगले तुमच्यासाठी होणार आहे. अन्यथा तुम्हाला इतर अनेक आव्हानांसह नातेसंबंधांमध्ये दुरावाही येईल. अगदी घटस्फोटापर्यंत परिस्थिती जाण्याची शक्यता आहे. एवंढ नाही तर आर्थिक नुकसान होईल. संयमाने केलेली कामे पूर्ण होईल. अनावश्यक वादांपासून दूर राहणेच तुमच्या हिताचे ठरणार आहे.
मंगळ ग्रह याच राशीतच प्रतिगामी होणार असल्याने राशीच्या लोकांसाठी येणारा काळ अशुभ ठरणार आहे. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये नुकसान होणार आहे. कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण होणार आहे. वादविवाद वाढणार आहे. कामात नुकसान होणार आहे. मात्र तुम्ही निराश होऊ नका. मेहनत आणि झोकून देऊन केलेल्या कामात फायदा तुम्हाला फायदा मिळणार आहे. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांना मंगळाच्या प्रतिगामीमुळे नुकसान सहन करावा लागणार आहे. या काळात आर्थिक नुकसान होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी मतभेदाची परिस्थिती निर्माण होणार आहे. आर्थिक नुकसान होईल. म्हणून, आपले पैसे हुशारीने खर्च करा. कामात नुकसान होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बॉस किंवा सहकाऱ्यांशी वाद होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)