Saturn And Venus Yuti 2023: ग्रहांच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या स्थितीमुळे जातकांचं आयुष्य अनिश्चित होतं. प्रत्येक गोचर, अस्त, उदय यांचे जातकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक बदल होत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची गोचर स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कधी कधी एकाच राशीच दोन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह एकत्र येतात. सध्या शनिदेव मकर राशीत असून शुक्राच्या गोचरामुळे या दोन्ही मित्रांची युती झाली आहे. 17 जानेवारीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामागोमाग शुक्र कुंभ राशीत राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 22 जानेवारीपासून कुंभ राशीत शनि-शुक्राची युती होणार आहे. हे दोन्ही मित्र ग्रह असल्याने काही राशींना लाभ होणार आहे. मकर राशीतील युतीचा कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या.
वृषभ- या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यात मकर राशीत शुक्र-शनिची युती या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. या राशीच्या नवम स्थानात ही युती झाली आहे. यामुळे नशिब आणि विदेशवारीची शक्यता आहे. या काळात नशिबाची साथ मिळणार असून अडकलेली कामं मार्गस्थ लागतील. विदेशात शिक्षणाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना फायदा होईल.
धनु- शुक्र-शनि युती धनु राशीसाठी फलदायी ठरणार आहे. ही युती दुसऱ्या स्थानात म्हणजेच धन-वाणीच्या स्थानात होणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात धार्मिक घडामोडी वेगाने घडतील. व्यवसायातील अडकलेली कामं पूर्ण होतील. ज्या कामात हात टाकाल ती कामं पूर्ण होतील.
बातमी वाचा- Shani 2023: शनि कुंभ राशीत जाताच 28 दिवस तेज होणार कमी, या राशींची 9 मार्चपर्यंत चांदी
मीन- या राशीच्या दशम स्थानात शनि आणि शुक्राची युती होणार आहे. हे स्थान कार्यक्षेत्र आणि नोकरीचं स्थान आहे. या काळात उत्पन्नात वाढ होईल. तसेच आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल आणि पदोन्नती मिळू शकते. बेरोजगार तरुणांना नोकरीची ऑफर मिळेल. वडिलांसोबतचे संबंध आणखी चांगले होतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)