Shukra Margi 2023: शुक्र ग्रह कर्क राशीत झाला मार्गस्थ; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Shukra Margi 2023: शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे त्यांच्या हालचालीचा परिणाम मानवी जीवनावर त्याचप्रमाणे सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राची विशेष कृपा असणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 21, 2023, 08:05 AM IST
Shukra Margi 2023: शुक्र ग्रह कर्क राशीत झाला मार्गस्थ; 'या' राशींचं नशीब फळफळणार title=

Shukra Margi 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर त्यांच्या हालचालीत बदल करतो. यावेळी धन आणि समृद्धी देणाऱ्या शुक्र ग्रहाने 4 सप्टेंबर रोजी कर्क राशीत मार्गस्थ झाला आहे. शुक्र हा विलास, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य, विलास आणि भौतिक सुखाचा ग्रह आहे. 

शुक्र मार्गस्थ झाल्यामुळे त्यांच्या हालचालीचा परिणाम मानवी जीवनावर त्याचप्रमाणे सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राची विशेष कृपा असणार आहे. या राशींच्या व्यक्तींना यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया शुक्र मार्गीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

मेष रास (Aries Zodiac)

शुक्राची मार्गी स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असेल. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकतं. आर्थिक दृष्टिकोनातून गुंतवणुकीसाठी हा खूप चांगला काळ आहे. तुम्हाला भागीदारीत यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खूश असणार आहेत.

मीन रास (Meen Zodiac)

शुक्राची थेट हालचाल मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकणार आहे. या काळात तुमचं ज्ञान वाढणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. व्यवसायात अपार यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फायदेशीर ठरू शकते. 

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राची मार्गी हालचाल फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या ऑफर मिळण्याचीही शक्यता आहे. करिअरसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुम्ही शेअर मार्केट आणि लॉटरीत पैसे कमवू शकता.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )