Sawan Somvati Amavasya 2023 : आज अतिशय दुर्मिळ आणि दुहेरी योग जुळून आला आहे. आज आषाढ महिन्यातील अमावस्या आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे त्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात. सोबतच आज दीप अमावस्यादेखील आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ही अमावस्या ओळखली जाते. या अमावस्येला पितरांची पूजा करणं शुभ असतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. आजच्या दिवशी महादेव भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. भोलेनाथाच्या पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं. (Somvati amavasya 2023 snan daan muhurat puja time and importance Sawan 2023)
रविवारी 16 जुलैला रात्री 10:08 वाजेपासून अमावस्या तिथीला सुरुवात झाली आहे. आज रात्री 12:01 वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे.
आज अतिशय दुर्मिळ आणि शुभ असे तीन योग तयार झाले आहेत. रुद्राभिषेक, पुष्कर आणि सर्वार्थ सिद्धी असं तीन योग आहेत. पंचांगानुसार आज पहाटे 05.11 ते 05.35 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर रुद्राभिषेकासाठी संपूर्ण दिवस शुभ असून हा योग सकाळपासून रात्री उशिरापर्यंत 12:01 पर्यंत असणार आहे.
आज सकाळी लवकर उठून स्नान केल्यावर काळे तीळ असलेले पाणी सूर्यदेवाला अर्पण करा.
त्यानंतर माता पार्वती आणि महादेवाची पूजा करा.
पूजेच्या सुरुवातीला शिवलिंगावर अभिषेक करा आणि बेलपत्र, भांग, धतुरा, फुलं इत्यादी गोष्टी अर्पण करा.
या पूजेच्या वेळी शिव चालीसा आणि शिव मंत्रांचा जप नक्की करा. रुद्राक्षाची माळ जपमंत्रासाठी फलदायी ठरेल.
पूजा झाल्यानंतर दानधर्म करा.
आजच्या दिवशी पिपळाच्या झाडाची पूजा नक्की करा. गंगाजल मिश्रित पाणी पिंपळाला अर्पण करा. त्याशिवाय कच्च्या सुती धाग्याने पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा घाला. या उपायाने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं, अशी मान्यता आहे.
आज सोमवती अमावस्याला स्नान, दान आणि पूजा करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहे. पहिला शुभ मुहूर्त पहाटे 05.34 ते 07.17 वाजेपर्यंत आहे. तर दुसरा मुहूर्त सकाळी 09:01 ते 10:44 पर्यंत आहे. त्याशिवाय आज अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:55 पर्यंत आहे.