मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी शनिवार, 18 जून रोजी येत आहे. या दिवशी पहाटे वैधता योग असेल.या योगात स्थिर कार्य करता येईल, पण या दरम्यान कोणत्याही प्रकारचा प्रवास आणि घाईत काम करु नका.
शनिवारी शुभ परिणाम मिळण्यासाठी, व्यवसायात वाढ, न्यायालयीन वादातून सुटका इत्यादीसाठी शनिवारी हे उपाय केल्यास फायदा होईल.
- उधार दिलेले पैसे परत मिळवायचे असतील तर शनिवारी मंगळ मंत्राचा जप करा. या दिवशी 'ओम क्रीं क्रीं क्रौंस: भौमाय नमः' असा जप केल्याने तुमचे अडकेलेले पैसे लवकरच परत मिळतील.
- करिअरमध्ये अडचणी येण्यासाठी किंवा चांगली नोकरी मिळविण्यासाठी शनिवारी सकाळी स्नान वगैरे करून शिव मंदिरात शमीपत्र अर्पण करावे. असे केल्याने नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतात.
- कौटुंबिक नात्यात गोडवा ठेवण्यासाठी शनिवारी हनुमानजींना मध अर्पण करणे लाभदायक ठरते. तसेच 'ओम हून हनुमंते नमः' या मंत्राचा 11 वेळा जप करावा. असं केल्यास कुटुंबात गोडवा राहील.
- शुभ फळ मिळण्यासाठी शनिवारी शमीच्या झाडाची पूजा करा. तसेच, या दिवशी शमीच्या झाडाशी संबंधित कोणत्याही गोष्टीचे नुकसान करणे हानिकारक असू शकते. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.
- शक्ती आणि बुद्धिमत्ता मिळविण्यासाठी केशर कुंकूमध्ये थोडे चमेलीचे तेल मिसळा. त्यानंतर कुंकू मंदिरातील पुजाऱ्याला द्या किंवा स्वतः हनुमानजींना कुंकू लावू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)