राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अपेक्षेहून अधिक शुभ असेल

यशप्राप्तीचा योग आहे

Updated: Sep 16, 2020, 07:28 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अपेक्षेहून अधिक शुभ असेल  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- कामाचा व्याप वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. अनेक गोष्टी मार्गी लागतील. प्रवासयोग आहेत. अडचणींवर मात कराल. 

वृषभ- जुने वाद मिटतील. आपली आणि इतरांची काळजी घ्या. नव्या कपड्यांची खरेदी कराल. सक्रियतेचा स्तर वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांची मदत मिळेल. 

मिथुन- धनलाभ होण्याचा योग आहे. आता होणारा फायदा प्रदीर्घ काळासाठी चालेल. एखादी शुभवार्ता सारंकाही बदलून जाईल. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल. 

कर्क- अचानक धनलाभाचा योग आहे. वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्याल. सहनशक्ती वाढेल. 

सिंह- आर्थिक स्थितीमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. महत्त्वाकांक्षा वाढलेली असेल. अपेक्षांवर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांना तुमच्या कामातील मेहनत दिसेल. तणाव कमी होईल. 

कन्या- नोकरीच्या ठिकाणी काही नव्या संकल्पना अंमलात आणाल. जोडीदाराची साथ मिळणार आहे. जुनी कामं मार्गी लावा फायदा होणार आहे. कौटुंबीक सुख मिळेल. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. आजचा दिवस फायद्याचा आहे. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या व्यक्ती मदतीच्या ठरतील. दिवस शुभ असेल. 

धनु- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीनं दिवस चांगला आहे. यश मिळणार आहे. जुनी कामं मार्गी लावा. अविवाहितांसाठी विवाहप्रस्ताव येतील. 

मकर- महत्त्वपूर्ण कामं पूर्ण करा. मेहनत करा फळ मिळणार आहे. अविवाहितांनी चिंता करु नका. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा होईल. 

 

कुंभ- दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. धनलाभ होण्याचा योग आहे. नव्या कामाचा विचार करालय दैनंदिन कामाचा व्याप जास्त असेल. धैर्यानं पुढे जा. आरोग्याची चिंता मिटेल. 

मीन- आज जी कामं कराल त्याचा फायदाच होणार आहे. प्रगतीपथावर तुमची वाटचाल योग्य दिशेनं सुरु आहे. अनपेक्षित आणि सुखद घटनांसाठी तयार राहा. आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.