मेष- प्रदीर्घ काळापासून चाललेल्या एखाद्या कामाचा फायदा होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक नव्या योजना सुचतील. आज तुम्ही अनेक बाबतीत वर्चस्व सिद्ध कराल. दिवस आनंददायी असेल.
वृषभ- नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात कराल. याचा फायदा तुम्हाला होणार आहे. नव्या कामांमध्ये बऱ्याच अंशी प्रयोगशील असाल. जोडीदाराला वेळ द्या. दिवस सुखदायी आहे.
मिथुन- नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. समजुतदारपणे निर्णय घ्या. शांतता असेल. अडचणींवर मात करण्य़ासाठी नवे मार्ग सुचतील.
कर्क- आर्थिक परिस्थिती सुधारेल. एखाद्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर, याचा फायदा होणार आहे. धीरानं पुढे जा. अपेक्षांवर नियंत्रण ठेवा.
सिंह- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. आर्थिक परिस्थिती बऱ्याच अंशी सुधारेल. कोणा एका व्यक्तीशी असणारे वाद मिटतील. सहनशक्ती ठेवा.
कन्या- तणाव दूर होईल. स्वत:ची काळजी घ्या. समाज आणि कुटुंबात योग्य तो समतोल राखा. मिळकत आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांची मदत मिळेल.
तुळ- एखादं महत्त्वपूर्ण काम मार्गी लावा. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. जुनी आणि अडकलेली कामं मार्गी लावा.
वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. नव्या नोकरीची संधी मिळेल. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. अनेकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्याल.
धनु-तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही अशा गोषअटी समोर येतील त्यांचा भविष्यात फायदा होणार आहे. आजार दूर होतील.
मकर- विचाराधीन कामं पूर्ण होतील. या कामांचा फायदा होणार आहे. सामूहिक कामांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांची मदत मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील.
कुंभ- आजच्या दिवशी जे काम कराल त्याचा फायदाच होणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचाच विचार कराल. कागदोपत्री कामकाजावर लक्ष द्या. प्रवासास निघण्याची इच्छा होईल.
मीन- धैर्यानं पुढे जा. दिवसभर पैशांचा विचार कराल. आरोग्याची काळजी घ्या. दैनंदिन कामाचा व्याप वाढेल.