Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र युतीने'या' राशी होणार श्रीमंत

Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग' हा दुर्मिळ योग लवकरच येतार होतो आहे. या पंचग्रही योगामुळे काही राशीं श्रीमंत होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 15, 2023, 06:30 PM IST
Panchagrahi Yoga : सिंह राशीत 12 वर्षांनंतर 'पंचग्रही योग'! शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र युतीने'या' राशी होणार श्रीमंत  title=
Surya Budh mangal Shukra Chandra Gochar 2023 panchagrahi yog zodiac signs get money

Panchagrahi Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपलं स्थान बदलतं. कुंडलीतील त्यांचं स्थान बदलणं म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रात त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रहांचं जेव्हा गोचर होतं तेव्हा कुंडलीत शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. त्याचा परिणाम जाचकाच्या आयुष्यावर होत असतो. लवकरच पाच ग्रह आपलं स्थान बदलणार आहे. सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. खरं तर त्यापूर्वी सिंह राशीत हे पाच ग्रह एकत्र भेटणार आहेत. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनी विशेष आणि दुर्मिळ असा पंचग्रही योग निर्माण झाला आहे. (Surya Budh mangal Shukra Chandra Gochar 2023 panchagrahi yog zodiac signs get money )

 'पंचग्रही योग' कसा तयार होतो आहे? 

सिंह राशीत पहिलेपासूनच बुध, शुक्र आणि मंगळ एकत्र असल्याने त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. आता चंद्र बुधवारी 16 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर गुरुवारी 17 ऑगस्टला सूर्यदेव सिंह (Surya Gochar 2023) राशीत येणार आहे. यामुळे सिंह राशीत पाच ग्रहांचं मिलन होऊन पंचग्रही योग तयार होणार आहे. विशेष म्हणजे बुध शुक्र ( budh shukra Yuti) यांच्या युतीतून लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. तर चंद्र आणि मंगळ यांच्या भेटीमुळे लक्ष्मी योगही जुळून आला आहे. (Surya Mangal Yuti)

'या' राशी होणार श्रीमंत 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना पंचग्रही योगामुळे सर्वाधिक लाभ होणार आहे. पंचग्रही योग या लोकांच्या कुंडलीतील नवव्या घरात निर्माण होतो आहे. त्यामुळे या लोकांना प्रत्येक कामात प्रत्येक क्षणी नशिबाची साथ मिळणार आहे. काही लोकांशी तुमची ओळख होणार आहे. त्या ओळखीतून तुम्हाला फायदा होणार आहे. बिझनेस करणाऱ्यासाठी हा योग शुभ असणार आहे. प्रेमाच्या नात्यात चांगले परिणाम दिसणार आहेत. घरात आनंदी शुभ कार्य असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा योग प्रगती घेऊन येणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून 'या' राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांचं आयुष्य पंचग्रही योगामुळे नशिब पालटणारा ठरणार आहे. या लोकांना आयुष्यात या योगामुळे भौतिक सुखात वाढ होणार आहे. गाडी, मालमत्ता खरेदी करणार आहात. त्याशिवाय वडिलांकडून आर्थिक फायदा होणार आहे. न्यायालयीन प्रकरण या योगामुळे निव्वळणार आहे. 
 

मिथुन (Gemini)

या राशीच्या कुंडलीतील तिसऱ्या घरात पंचग्रही योग तयार होतो आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. परदेशात व्यापार करणाऱ्यांना या योगामुळे मोठा आर्थिक लाभ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे. तर इतर नात्यांमधील गैरसमज दूर होऊन नातं मजबूत होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Brihaspati Nakshatra Gochar : देव गुरु 21 वर्षांनंतर भरणी नक्षत्रात गोचर, नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींवर गुरुची कृपा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)