मुंबई : नवे वर्ष नवा उत्साह असतो. नवीन वर्ष खूप चांगलं जावं अशी अशा असूनही काही राशींच्या व्यक्तींना सुरुवात चांगली झाली नाही. मात्र आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चांगला योग येणार आहे. काही राशींमागची संक्रांत दूर होणार आहे. तर काही राशींना पुढचा आठवडा सतर्क राहावं लागणार आहे.
नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात, ग्रहांचा राजा सूर्य राशीत बदल होणार आहे. इतर राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव पडणार आहे. या आठवड्यात 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. टॅरो कार्ड रीडर मोड मॉन्क अंशुल यांच्याकडून जाणून घ्या 10 जानेवारी 2022 ते 17 जानेवारी 2022 हा काळ सर्व राशींसाठी कसा असेल.
मेष : तुमच्या आयुष्यात संतुलन निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. जे काही घडत आहे ते होऊ द्या. एखाद्या व्यक्तीशी नाते जोडणे खूप त्रास देत असेल. नको असलेल्या व्यक्तींपासून दूर राहाण्याचा प्रयत्न करा. जास्त विचार केल्याने काम बिघडू शकते.
वृषभ: हा आठवडा खूप व्यस्त असेल, तुमची पेंडिगं काम पूर्ण होतील. आठवडा तणावपूर्ण असू शकतो, त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. ध्यान किंवा योगाचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी, सर्व कामे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद आणि आराम वाटेल.
मिथुन: तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखून त्या दिशेनं काम करावं लागणार आहे. यावेळी नशीब तुमच्या सोबत आहे. आपण संयम आणि शांततेनं वागलात तर आपल्याला शंभर टक्के यश मिळणार आहे.
कर्क: आर्थिक परिस्थिती ओळखून बजेट तयार करा. तुम्हाला चिंता वाटू शकते आणि गोष्टींवरील नियंत्रण गमावू शकता. हा आठवडा तुम्ही कौशल्याने घालवाल. शांत आणि संयम बाळगणं गरजेचं आहे.
सिंह: तुमचे त्रास हळूहळू पण निश्चितपणे दूर होत आहेत. नव्या नोकरीच्या संधी आहेत. कौटुंबिक समस्या दूर होतील. विनाकारण प्रतिक्रिया न देणं हिताचं ठरेल.
कन्या : कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. नवीन पद्धत वापरून पाहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. पुढे जाण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा काळ आहे.
तुळ: हा आठवडा आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिकदृष्ट्या तुम्हाला थकवा आणि शक्तीहीन वाटू शकते. नकारात्मक विचार आपल्या मनात येतील. तुमचा विचार सकारात्मक ठेवा आणि कामांवर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
वृश्चिक : हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. वैयक्तीक आयुष्य आणि काम दोन्ही ठिकाणी तुमचं आयुष्य रुळावर येणार आहे. नव्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
धनु : शांत राहाणं आवश्यक आहे. हा आठवडा आपल्याला सावध राहावं लागेल. मानसिक संघर्ष खूप कठीण असू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. येऊ घातलेला गोंधळ तुम्हाला खूप काही शिकवेल.
मकर: तुमच्या इच्छांसाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागणार आहे. ळ, शक्ती आणि मेहनत देण्यास तयार राहा. कठोर परिश्रम करण्याची आणि तुमची स्वप्ने साकार करण्याची हीच वेळ आहे.
कुंभ : तुम्हाला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात तुम्ही खूप संतप्त आणि दु:खी असणार आहात. तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं खूप आवश्यक आहे.
मीन: गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली आहे. आपल्या योजनांवर काम करत राहा. चालू कामात मोठा फायदा होईल.हा आठवडा तुम्हाला थोडा त्रासदायक असू शकतो.