पंतप्रधान मोदींनी द्वारकाला अर्पण केलेल्या मोर पखांचं श्रीकृष्णाशी नातं काय?

PM Modi Dwarka : पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, जेव्हा ते समुद्राच्या खोलवर गेले तेव्हा त्यांना देवत्वाचा अनुभव आला. त्यांनी श्रीकृष्णाला आवडती वस्तू मोर पख अर्पण केलं. तुम्हाला श्रीकृष्ण आणि मोर पखांचं नातं माहिती आहे का?

नेहा चौधरी | Updated: Feb 25, 2024, 05:33 PM IST
पंतप्रधान मोदींनी द्वारकाला अर्पण केलेल्या मोर पखांचं श्रीकृष्णाशी नातं काय?  title=
What is the relation of the peacock wings offered by Prime Minister Modi to Dwarka with Shri Krishna

PM Modi Dwarka : भगवा कुर्ता, कंबरेला मोरे असलेले सुरेख पैठणीचा पंचा आणि त्यात मोर पंख...या रुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमद्रात बुडलेल्या द्वारकाचं दर्शन घेण्यासाठी भक्तीची डुबकी घेतली. गोमती घाटावरील सुदामा पूल ओलांडून मोदी पंचकुई बीच परिसरात आले. त्यानंतर 2 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात त्यांनी डुबकी मारली. सुमद्रात खोल पाण्यात स्कूबा डायव्हिंग करत श्रीकृष्णाच्या नगरीत गेले. तिथे त्यांनी अगदी भक्तीभावाने कान्हाला मोर पंख अर्पण केले. (What is the relation of the peacock wings offered by Prime Minister Modi to Dwarka with Shri Krishna)

श्रीकृष्ण मोराची पिसे का घालतात?

आपल्याला प्रत्येकाला माहिती श्रीकृष्णाला मोर पंख खूप प्रिय आहेत. श्रीकृष्णाची मूर्ती ही मोर पंखाशिवाय कधीही पाहिली नाही. आई यशोद लहानपणापासूनच बाळगोपाळाच्या डोक्यावर मोर पंख लावून सजावट करतात. श्रीकृष्ण मोराची पिसे का घालतात यामागे अनेक कथा आहेत. एका आख्यायिकानुसार एकदा राधा कृष्णाच्या बासरीवर नाचत होती. त्यावेळी कृष्णाच्या बासरीच्या मधुर सुरावर मोरही नाचत होते. तेव्हा एका मोराचं पंख खाली पडले. श्रीकृष्णाने ते मोर पंख कपाळावर सजवलं. तेव्हा पासून मोराच्या पिसांना श्रीकृष्णराधेच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. तेव्हापासून श्रीकृष्णाच्या कपाळावर कायम मोर पंख सजवले जातं. 

असं म्हणतात की, कृष्ण आपल्या मित्र आणि शत्रूमध्ये कधीही तुलना करत नव्हते. श्री कृष्णाचा भाऊ बलराम हा शेषनागचं अवतार होता. मोर आणि नाग हे एकमेकांचे शत्रू होते. त्यामुळे कृष्णाच्या कपाळावरील मोर पंखातून असा संदेश दिला जातो की, श्रीकृष्णाच्या आयुष्यात मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये भेदभाव ठेवत नाही. 

मोर आणि साप यांच्यात वैर होतं त्यामुळे कालसर्प योगामध्ये मोराची पिसे सोबत ठेवण्याचा सल्ला धार्मिक शास्त्रात दिला जातो. धार्मिक शास्त्रानुसार श्रीकृष्णालाही कालसर्प योग होता अशी मान्यता होती. कालसर्प दोषाचा सामना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने नेहमी मोराची पिसे सोबत ठेवले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

श्री कृष्णाने मोराची पिसे धारण करण्यामागे एक लोकप्रिय कथा आहे. मोर हा एकमेव पक्षी आहे जो आयुष्यभर ब्रह्मचारी असतो. नर मोराचे अश्रू पिऊन मादी मोर गर्भधारणा होते असं म्हणतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण आपल्या कपाळावर अशा पवित्र पक्ष्याचे पंख उठून दिसतात. 

श्रीकृष्ण नंदगांवात इतर गोपाळांसह गाई चरण्यासाठी जंगलात जात असत. त्यावेळी मोर पंख पसरून त्यांच्याभोवती श्रीकृष्ण नाचत असत. तेव्हापासून श्रीकृष्ण हे गाय आणि मोरांच्या पिसांसोबत जोडले गेले आहेत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)