सिडनी : भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव झाला. मागच्या ७१ वर्षांमध्ये भारतानं पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकली. एवढच नाही तर भारत हा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला. हा पराभव ऑस्ट्रेलियाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी ऑस्ट्रेलियानं ५ खेळाडूंना डच्चू दिला आहे. यामध्ये एरॉन फिंच, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, शॉन मार्श, मिचेल मार्श आणि क्रिस ट्रेमन या खेळाडूंचा समावेश आहे. ट्रेमनला भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळायची संधी मिळाली नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी ऑस्ट्रेलियानं युवा बॅट्समन पुकोवस्की आणि फॉर्ममध्ये असलेल्या जो बर्न्सला संधी दिली आहे. जो बर्न्स मार्कस हॅरिससोबत ओपनिंगला खेळू शकतो. या सीरिजची पहिली टेस्ट २४ जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये होईल. ही टेस्ट मॅच डे अॅण्ड नाईट असेल. तर दुसरी टेस्ट मॅच एक फेब्रुवारीपासून कॅनबेरामध्ये सुरु होईल. या टेस्ट सीरिजआधी ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध ३ वनडे मॅचची सीरिज खेळेल. ही वनडे सीरिज १२ जानेवारीपासून सुरु होणार आहे.
तर दुसरीकडे श्रीलंकेच्या टीममध्ये कुशल परेराचं पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजला मुकणाऱ्या एंजलो मॅथ्यूजची टीममध्ये निवड झालेली नाही.
टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, मार्नस लॅबुश्गाने, पॅट कमिन्स, जोस हेजलवूड, नॅथन लायन, विल पुकोवस्की, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, पीटर सीडल
दिनेश चंडीमल (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, लाहिरु थिरिमाने, कुशल मेंडिस, सादिरा समाराविक्रमा, धनंजय डिसिल्वा, रोशलेन सिल्वा, निरोशन डिकवेला, कुशल परेरा, दिलरुवान परेरा, लक्षण संदकाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, लाहिरु कुमारा, दुशमंथा चमीरा, कासुन रजिथा