IPL 2022 : आज CSK आणि PBKS यांच्यात सामना खेळला जात आहे. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आयपीएलमध्ये पहिल्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात धोनीची (MS Dhoni) जुनी शैली पुन्हा एकदा दिसून आली. सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीने डाय मारत पंजाब किंग्जचा फलंदाज भानुका राजपक्षेला रनआऊट केले. (Awesome fitness of Dhoni even at 40 years)
Dhoni चांगल्या फॉर्ममध्ये जिसत आहे. बॅटने देखील तो चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 40 वर्षीय धोनी या मोसमातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. असे असतानाही धोनीने या सामन्यात कमालीची चपळाई दाखवत पंजाबच्या भानुका राजपक्षेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. धोनीच्या या कृतीमुळे पंजाबची लय तुटली. राजपक्षे जबरदस्त फॉर्ममध्ये असून गेल्या दोन सामन्यांत त्याने चांगली फलंदाजी केली आहे.
पंजाब किंग्जकडून कर्णधार मयांक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) सलामीला आले होते. मात्र, कर्णधार मयांक अग्रवाल पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर भानुका राजपक्षे मैदानात आला. राजपक्षेने येताच आक्रमक खेळ सुरु केला. पण जेव्हा ख्रिस जॉर्डन गोलंदाजीसाठी आला त्याच्या बॉलवर राजपक्षे धाव घेण्यासाठी धावला. यादरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये हो, नाही, नाही अशी धावपळ झाली आणि तोपर्यंत जॉर्डनने स्वत: चेंडू उचलून धोनीच्या दिशेने फेकला. यानंतर धोनीने डायव्ह करत त्याला स्टंप आऊट केले.
राजपक्षेला पाच चेंडूत केवळ नऊ धावा करता आल्या. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या IPL 2022 च्या 11 व्या सामन्यात, रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने पंजाब किंग्ज (PBKS) कर्णधार मयंक अग्रवाल विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेला त्यांच्या दोन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.