नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना रंगणार आहे. दुबईमध्ये आज हा सामना रंगणार आहे. त्यातच सट्टा बाजारात देखील या सामन्यावर बोली लागायला सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी सट्टा बाजार गरम झालाय. मनी कंट्रोलच्या बातमीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यावर भाव लागला आहे. दोन्ही ही संघावर मोठा भाव लावला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सट्टा बाजारात जवळपास 2500 कोटींचा सट्टा लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही रक्कम आणखी मोठी असू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार सट्टा बाजारात भारतावर 1.85 पैसे भाव लावला जात आहे. याचाच अर्थ असा की, जर भारतावर सट्टा लावला आणि भारत जिंकला तर तुम्हाला 1 रुपयांच्या बदल्या 1.85 पैसे मिळतील. पाकिस्तानवर 2.16 रुपयांचा भाव लावला जात आहे. जर पाकिस्तान जिंकली तर 1 रुपयाच्या बदल्यात 2.16 रुपये मिळतील.
सट्टा बाजारात आशिया कपमध्ये भारत ही सर्वात फेव्हरेट टीम मानली जात आहे. कारण ज्या टीमवर सर्वात कमी भाव लावला जातो त्या टीमच्या विजयाच्या शक्यता जास्त असतात. मॅच दरम्यान अनेकदा भाव बदलतात.
आशिया कपमध्ये यंदा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यात 3 वेळा सामना होऊ शकतो. दोन्ही टीम ग्रुप-ए मध्ये आहेत. पहिला सामना आज झाल्यानंतर पुन्हा सुपर-4 मध्ये सामना होऊ शकतो. त्यानंतर प्रत्येक टीम एक -दूसऱ्यासोबत सामने खेळेल. त्यानंतर फायनलमध्ये देखील भारत -पाकिस्तानचा आमना-सामना होऊ शकतो.
सट्टा बाजारात सट्टा जय-पराजयावर नाही लागत. प्रत्येक बॉलवर सट्टा लावला जातो. तसेच बॉलर आणि बॅट्समनवर देखील सट्टा लावला जातो. हे सर्व फोनवर सुरु असतं. ऑनलाईन पद्धतीने देखील लोकं सट्टा लावतात.