Big Bash League 2022-23 : क्रिकेट विश्वात एबी डिविलीयर्स नंतर सुर्यकुमार यादवला (Surykumar yadav) 'मिस्टर 360' म्हणतात. कारण सुर्या कोणताही बॉल मैदानात कोणत्याही दिशेने मारू शकतो. त्याच्यामध्ये तशी क्षमता आहे. त्याची ही बॅटींग अनेक दिग्गज खेळाडूंना तोंडात बोट घालायला भाग पाडते. आता क्रिकेट वर्तुळाला आणखीण एक 'मिस्टर 360' मिळाला आहे. या खेळाडूने देखील सर्वानाच आश्चर्यचकीत केले आहे. या खेळाडूच्या बॅटींगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सध्या क्रिकेटच्या मैदानात सूर्यकुमार यादवच्या (Surykumar yadav) फलंदाजीचीच चर्चा आहे. त्याची ही बॅटींग पाहून बॉलर्ससह क्रिकेट फॅन्स देखील अवाक झाले आहेत. आता अशीच खेळी आणखीण एका खेळाडूने करून दाखवली आहे. हाँगकाँगच्या या खेळाडूने अशी आश्चर्यकारक खेळी केली आहे. खेळाडूने 73 धावांची मोठी खेळी केली, या खेळीदरम्यान त्याने अनेक अनोखे शॉट्स मारले आहेत. हे शॉट्स पाहून सर्वांनाच आश्चर्य धक्का बसला आहे. या त्याच्या खेळीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
हॉगकॉंगच्या या खेळाडूचे नाव सॅम हेन (Sam Hain) आहे. या सॅमने त्याच्या फलंदाजीदरम्यान 'रिव्हर्स-रॅम्प' शॉट मारला, जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. सॅमने (Sam Hain) या शॉटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले हे की, यावर्षी तुम्ही आतापर्यंतचा सर्वोत्तम रिव्हर्स-रॅम्प शॉट पाहिला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्सही येत आहेत
बॉलरने चेंडूची रेषा ओळखून मधल्या स्टंपवर सॅमकडे चेंडू टाकला, फलंदाजाने दोन्ही पाय पसरून उलटा फटका मारला, जो थेट चौकारापर्यंत गेला. हा शॉट पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलियर्सची आठवण झाली आहे. सोशल मीडियावर चाहते सॅमच्या या शॉटचे कौतूक करत आहेत.
What a shot! How good from Sam Hain #BBL12 pic.twitter.com/3tZ8rv573i
— 7Cricket (@7Cricket) January 22, 2023
दरम्यान बिग बॅश लीग 2022-23 (Big Bash League 2022-23) च्या 51व्या सामन्यात ब्रिस्बेन हीटने (Brisbane Heat) मेलबर्न स्टार्सचा 4 धावांनी पराभव केला. या सामन्यात ब्रिस्बेनचा हिट (Brisbane Heat) फलंदाज सॅम हेनने (Sam Hain) 41 चेंडूत 73 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहेत. सॅमच्या या खेळीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.