मुंबई : आयपीएलच्या ११ व्या सिझनमधील पहिले शतक हे ख्रिस गेलच्या नावावर जमा झालेय. मोहाली येथे पंजाबकडून खेळताना हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. ११ षटकार आणि १ चौकारच्या सहायाने नाबाद १०४ धावा फटकावल्या. त्याचे आयपीएलमधील २१ वे शतक आपल्या मुलीला बहाल केले. दरम्यान, आयपीएलच्या टी-२० क्रिकेटसाठी ख्रिस गेलवर दोन वेळा खरेदी केले गेले नाही. बोली न लागल्याने बंगळुरुकडून खेळणारा गेल कोणत्याच टीममध्ये नव्हता. मात्र वीरेंद्र सेहवागचा सल्ला अभिनेत्री प्रीती झिंटा हिने मानला आणि गेलाला पंजाब संघात घेतले. गेलने तुफान बॅटिंग करुन पंजाबला दोन सामने आरामात जिंकून दिले आणि टीकाकारांनी आपल्या बॅटने उत्तर दिलेय. त्याचा कुटुंबीयांबद्दल ही माहिती
ख्रिस गेलने आपले २१ वे शतक ठोकले त्यावेळी स्टेडिअममध्ये त्याची गर्लफ्रेंड आणि मुलगी उपस्थित होती. सामना संपल्यानंतर केविन पीटरसन याच्याशी बोलताना त्याने हे शतक मुलीच्या नावे बहाल केले.
ख्रिस गेलचे टी-२० क्रिकेटमधील २१ वे शतक आहे. त्याच्यापेक्षा जास्त शतक कोणीही मारलेली नाहीत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मायकल क्लिंगर आणि ब्रॅंडन मॅकुलम आहे. दोघांनी प्रत्येकी ७-७ शतक मारली आहेत.
गेलची गर्लफ्रेंडचे नाव नताशा बेरिज आहे. तिला एलिसा बेरिज नावानेही ओळखले जाते. नताशा एक फॅशन डिझायनर आहे.
ख्रिस गेल आणि नताशा यांनी २०१६ रोजी मुलीला जन्म दिला. आयपीएल क्रिकेट सामन्याच्यावेळी ख्रिस गेलने सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली.
नताशाने २०१६ला मुलीला जन्म दिला. जेव्हा नताशाने मुलीला जन्म दिला त्यावेळी आयपीएलमध्ये खेळत होता. बंगळुरुकडून गेल खेळत होता. गेल आणि नताशा आपल्या मुलीला ब्लश या नावाने हाक मारतात.
वेस्ट इंडिजच्या सेंट किट्समध्ये नताशा बेरिज अल्ट्रा कार्निव्हलची सदस्य आहे. नताशासोबत गेलही कार्निव्हलमध्ये सहभागी होतो.
ख्रिस गेलचे कुटुंब किंग्सटन जमैका येथे राहते. त्याचे वडील पोलीस आहेत. गेलला ६ बहीण-भाऊ आहेत.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा जगातील पहिला क्रिकेटर म्हणून ख्रिस गेलला ओळखले जाते.