स्टेडियममध्ये मैत्रिणीला किस करत लग्नासाठी अनोखं प्रपोज... पाहा व्हिडीओ

प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये 'त्याने' आधी किस आणि नंतर केलं प्रपोज.... पाहा व्हिडीओ

Updated: Dec 10, 2021, 03:59 PM IST
स्टेडियममध्ये मैत्रिणीला किस करत लग्नासाठी अनोखं प्रपोज... पाहा व्हिडीओ

गाबा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड गाबा स्टेडियमवर एशेज सीरिज सुरू आहे. या सीरिज दरम्यान चक्क एकाने आपल्या मैत्रिणीला जबरदस्त प्रपोज केलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक घटना समोर आली. त्यामध्ये एका चाहत्याने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. 

या चाहत्याने नुसतंच लग्नासाठी प्रपोज केलं असं नाही. तर त्याने प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये तिला किस केलं. त्यासोबत तिला मिठी मारली. 

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 8 विकेट्स गमावून 413 धावा झाला होता. अंपायरने ड्रिंक्स ब्रेक दिला. त्याचवेळी स्टेडियममध्ये बसलेल्या एक चाहत्याने आपल्या मैत्रिणीला सर्वांसमोर प्रपोज केलं. 

स्टेडियममध्ये दर्शकांनी या कपलला चियर्स केलं. चाहत्याने पहिलं किस केलं. नंतर रिंग घालून प्रपोज केलं आणि मिठी मारली. स्टेडियममध्ये इतर प्रेक्षकांनी यावेळी त्या दोघांनाही चियर्स केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.