'रोहितने बेन स्टोक्सला फोन केला, तुला कॉपी करु का?', इंग्लंडच्या दिग्गजाचा दावा, भारतीय म्हणाले, 'मूर्खा तुझं तोंड बंद ठेव'

India vs Bangladesh: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात टी-20 प्रमाणे फलंदाजी करत बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघ बेझबॉल खेळत असल्याचं इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं.   

शिवराज यादव | Updated: Oct 2, 2024, 05:35 PM IST
'रोहितने बेन स्टोक्सला फोन केला, तुला कॉपी करु का?', इंग्लंडच्या दिग्गजाचा दावा, भारतीय म्हणाले, 'मूर्खा तुझं तोंड बंद ठेव' title=

India vs Bangladesh: बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने दोन दिवस वाया घालवल्यानंतरही भारतीय संघाने फक्त अडीच दिवसात सामना जिंकत कमाल केली आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. यानंतर भारताने 9 गडी गमावत 285 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात बांगलादेश फक्त 146 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 95 धावांचं आव्हान होतं. पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही भारताने धडाकेबाज फलंदाजी करत दुसरा कसोटी सामना जिंकला. यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने रोहित शर्माने (Rohit Sharma) बेझबॉल कॉपी केल्याचा दावा केला. 

"मला सांगावं लागेल की, हा एक उल्लेखनीय कसोटी सामना होता. बांगलादेश संघाने 74.2 ओव्हर्समध्ये 233 धावा केल्या. भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला असता सर्व काही उत्तम दिसत होतं. त्यांनी केलेली प्रत्येक कामगिरी चमकदार होती. भारतीय कशाप्रकारे बेझबॉलर्स होत आहे, हे पाहणं मनोरंजक आहे. त्यांनी 34.4 ओव्हर्समध्ये 285 धावा केल्या. त्यांनी इंग्लंडला कॉपी केलं. जर तुम्हाला वाटत असेल की भारत इंग्लंडला कॉपी करतंय, तर ते जबरदस्त आहे," असं मायकल वॉन Club Prairie Fire पॉडकास्टवर म्हणाला. "मला कायदेशीरतेबद्दल माहिती नाही, इंग्लंड त्यांच्याकडून यासाठी शुल्क घेईल का?," असंही तो म्हणाला. 

पॅनेलमध्ये तज्ज्ञ म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ॲडम गिलख्रिस्टदेखील सहभागी झाला होता. तो म्हणाला"मला वाटतं की तुम्ही ठीक आहात. गंभीरने आधीच GamBall चं पेटंट घेतलं आहे. आता इंग्लंडला सावधपणे चालण्याची गरज आहे."

त्यावर मायकल वॉन म्हणाला की, "Gamball माझ्यासाठी बेझबॉल सारखाच दिसतो. कदाचित रोहितने बेन स्टोक्सला फोन केला आणि 'मी तुमची कॉपी करू शकतो' असं विचारलं. मी पोस्टही केली की, 'भारत बेझबॉल खेळत असल्याचं मला दिसत आहे. याला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. बऱ्याच जणांना यावर कमेंट्स केल्या".

यानंतर गिलख्रिस्टने त्याला काय प्रतिसाद होता असं विचारलं असता वॉनने उत्तर दिलं की,  "त्यापैकी एक म्हणाला, 'भारत रॉब बॉल खेळत आहे, तुझं तोंड बंद ठेवा मूर्खा." 

दरम्यान, रविचंद्रन अश्विनने मालिका संपल्यानंतर गौतम गंभीरच्या दृष्टिकोनाबद्दल तपशीलवार चर्चा केली. "मी 'Gamball' बद्दल काही पोस्ट पाहिल्या. कोणीतरी याबद्दल शेअर केलं होतं, जे मनोरंजक होते. प्रशिक्षक संघाच्या कल्याणासाठी येथे आहेत आणि ते कशाप्रकारे खेळाकडे पाहतात यात मला फारसा फरक दिसत नाही. खेळ किंवा त्यांची आवड भारतीय क्रिकेटसाठी उच्च पातळीवर आहे, म्हणजे ते ड्रेसिंग रूममध्ये अविश्वसनीय प्रेम आणतात,” असं अश्विनने मॅचनंतर JioCinema वर सांगितले.

"मला हे सांगताना थोडं धीरगंभीर वाटतंय, पण मी गौती भाई आणि राहुल भाई यांच्यासोबत खेळलो आणि ते त्या ड्रेसिंग रूममध्ये माझे प्रशिक्षक आहेत. भारतीय क्रिकेटबद्दलची त्यांची आवड स्पष्ट आहे, आणि त्याचा साक्षीदार होणं आश्चर्यकारक आहे,” असं तो पुढे म्हणाला.