मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीन जहा हिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. याच वर्षी मार्चमध्ये हसीन जहांने पती क्रिकेटर मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. हसीन जहांने मोहम्मद शमीवर मारहान, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, हिंसा आणि मॅच फिक्सिंग सारखे आरोप केले होते.
पण आता हसीन जहाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत तिने आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शमीवर मॅच फिक्सींगचा आरोपानंतर बीसीसीआयने शमीची चौकशीही केली होती. मात्र चौकशीनंतर बीसीसीआयने मॅच फिक्सिंगच्या आरोपातून शमीला मुक्त केले आहे.
हसीन जहाने जुलैमध्ये मोहम्मद शमीवर दुसरा विवाह केल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शमीने म्हटलं होतं की, 'जर असं झालं तर तो हसीनला या लग्नाला नक्की बोलवेल.'
I am pic.twitter.com/BQUenAWRLs
— Hasin Jahan (@HasinJahan4) July 11, 2018
काही दिवसांपूर्वीच हसीन जहांने एक फोटोशूट देखील केलं होतं. ज्यामुळे ती चर्चेत आली. पण यावर बोलताना तिने म्हटलं होतं की, 'मला माझं आणि माझ्या मुलीचं पोट भरण्यासाठी बॉलिवूड आणि सिनेमांमध्ये काम करण्यासाठी मजबूर व्हावं लागलं. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. डायरेक्ट अमजद खानने मला संपर्क केला आणि मी सिनेमाची ऑफर स्विकारली. कायदेशीर लढाईसाठी मला पैशांची गरज आहे.'
हसीन जहाचं एक बिंदास फोटोशूट देखील इंटरनेटवर व्हायरल झालं होतं. शमीने तिला मॉडलिंग करण्यापासून रोखलं. त्यानंतर मित्र आणि नातेवाईकांना देखील भेटण्यापासून देखील रोखल्याचा आरोप हसीनने शमीवर केला होता.
Hasin jahan I m pic.twitter.com/mXumuTAJRs
— Hasin Jahan (@HasinJahan4) July 7, 2018
हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरु आहे. शमीला एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे. हसीन जहाने शमीवर नुकसान भरपाईसाठी तक्रार दाखल केली आहे. हसीनने मोहम्मद शमीकडे उदरनिर्वाहासाठी दरमहिना 7 लाखांची मागणी केली होती. पण न्यायाधीशांनी तिची ही मागणी फेटाळून लावली होती. पण मुलीसाठी आर्थिक मदतीची तिची मागणी कोर्टाने स्विकारली आहे. ज्यासाठी दरमहिना 80 हजारांची मागणी तिने केली आहे.