40 सामन्यांमध्येच मी खूश; 100 व्या टेस्टवरून रोहितचा कोहलीला टोला?

आजचा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास खास आहे. कारण हा त्याचा 100 वा सामना आहे. 

Updated: Mar 4, 2022, 08:47 AM IST
40 सामन्यांमध्येच मी खूश; 100 व्या टेस्टवरून रोहितचा कोहलीला टोला? title=

मोहाली : श्रीलंकेविरूद्धचा पहिला सामना आज मोहालीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच खेळणार आहे. मुळात आजचा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास खास आहे. कारण हा त्याचा 100 वा सामना आहे. 

तर दुसरीकडे टेस्ट करियरच्या बाबतीत कर्णधार रोहित शर्माच्या अनेक चढ-उतार पहायला मिळाले. रोहितने 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात डेब्यू केलं होतं. त्यानंतर रोहित आता फक्त 43 सामने खेळला आहे. 

दरम्यान याचसंदर्भात रोहितला प्रश्न विचारण्यात आला. टेस्ट करियरबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, मी 40 टेस्ट सामने खेळूनच फार खूश आहे. 

रोहित म्हणतो, "मी माझ्या टेस्ट करियरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. यावेळी मला अनेक दुखापतीही झाल्या. मात्र खेळण्याच्या बाबतीत मी असं कोणंतही टार्गेट सेट केलेलं नाही."

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आणि ऐतिहासिक असणार आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली 100वा टेस्ट सामना खेळणार आहे. 100वा टेस्ट सामना खेळणारा तो 12 खेळाडू असणार आहे. दरम्यान या सामन्यात प्रेक्षकांची उपस्थिती राहणार आहे.