ICC T20 Rankings : टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तान विरुद्धच्या (Ind vs PAK) सामन्यात शानदार कामगिरी केली. हार्दिकला या कामगिरीचा चांगलाच फायदा झालाय. आयसीसीने टी 20 रँकिंग (ICC T20 Rankings) जाहीर केली आहे. हार्दिकने यामध्ये ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत 8 स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 5 व्या स्थानावर झेप घेतली आहे. (icc t20i ranking asia cup 2022 team india all rounder hardik pandya reached 5th position in allrounder rankings after against pakistan match)
हार्दिकने पाकिस्तान विरुद्ध 25 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच निर्णायक क्षणी 17 बॉलमध्ये नॉट आऊट 33 रन्स केल्या. यासह हार्दिकने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आशिया कपमध्ये अफगाणिस्तानच्या धडाकेबाज सुरुवातीकडेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाही टी 20 रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. राशिद खान नंबर वन गोलंदाज होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचं आयसीसी पत्रकात म्हटलंय.
लेग स्पिनर आदिल रशीद आणि अॅडम झाम्पा यांना 2 स्थानांचा फायदा झाला आहे. ते तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याचे 708 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.