प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं, घरचा विरोध; 8 वर्ष थांबला अन्..., मोहम्मद रिझवानची लव स्टोरी माहितीये का?

Mohammad Rizwan Love Story : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सामना खेळवला जातोय. त्याआधी तुम्ही मोहम्मद रिझवानची प्यारवाली लव स्टोरी ऐकलीत का?

सौरभ तळेकर | Updated: Jun 9, 2024, 04:36 PM IST
प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं, घरचा विरोध; 8 वर्ष थांबला अन्..., मोहम्मद रिझवानची लव स्टोरी माहितीये का? title=
mohammad rizwan love story

India vs Pakistan T20 World Cup match : सध्या क्रिडाविश्वात चर्चा सुरूये ती भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची... भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना 'करो या मरो' असेल. त्यामुळे पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या दोन फलंदाजांच्या खांद्यावर असेल. पाकिस्तानसाठी वर्ल्ड कप निराशाजनक जरी जात असला तरी पाकिस्तानमध्ये चर्चा होतीये ती मोहम्मद रिझवानची... 32 वर्षांच्या मोहम्मद रिझवानने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल म्हणजेच लव स्टोरीचा (Mohammad Rizwan Love Story) खुलासा केला होता.

मोहम्मद रिझवानने 2015 मध्ये लग्न केलं होतं. रिझवानचं एका मुलीवर प्रेम जडलं. पण ज्या मुलीशी रिझवानला लग्न करायचं होतं तिचं कुटूंब रिझवानशी लग्न करून देण्यास तयार नव्हतं. पण रिझवानने लग्न करणार तर तिच्याशीच.. असा निर्धार केला अन् तिच्यासाठी तब्बल 8 वर्ष वाट पाहिली. रिझवानने या काळात करियरवर फोकस केला अन् क्रिकेटमध्ये मोठी उंची गाठली. याच काळात रिझवान दिवसातून 5 वेळा नमाजमध्ये प्रार्थना करत असे. माझं प्रेम मला मिळावं यासाठी तो दररोज प्रार्थना करत असायचा. अखेर घरचे लग्नाला तयार झाले अन् रिझवानला त्याचं प्रेम मिळालं. रिझवानने 2015 मध्ये धुमधडाक्यात लग्न केलं. रिझवान आता दोन मुलांचा बाप आहे.

रिझवान म्हणतो...

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी (T20 WC 2024) मोहम्मद रिझवानने त्याच्या खासगी आयुष्यावर खुलासा केला होता. आपल्या समाजात लव मॅरेज करणं खूप अवघड असतं. माझ्या कुटूंबात लव मॅरेज करणारा पहिला व्यक्ती मी होतो. माझ्यानंतर माझ्या भावांनी देखील लव मॅरेज केलं. मी जास्त खोलात जाऊन तुम्हाला सांगणार नाही. पण मी तिच्यासाठी 8 वर्ष वाट पाहिली. मी दररोज नमाज पठण करत होतो. खुदाकडे मी तिची मागणी करत होतो आणि मला विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही मनापासून काही मागता तेव्हा खुदा तुम्हाला नाराज करणार नाही, असंही रिझवानने म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान संघाची सध्याची वर्ल्ड कपमधील परिस्थिती अधिकच बिकट झालीये. पहिल्याच सामन्यात युएसएने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. त्यामुळे आता जर पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला तर आगामी टी-ट्वेंटी प्रवास अधिक किचकट होणार आहे. तुम्हाला माहिती नसेल तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अ गटात आहेत आणि दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.