मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना आता पूर्वविराम मिळाला आहे. यासंदर्भात विराट कोहलीनं स्वत: पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन डे सीरिजमध्ये खेळणार की नाही यावर आपलं म्हणणं मांडलं आहे.
माझ्या बद्दल ज्या काही गोष्टी पसरवण्यात आल्या त्या सगळ्या अफवा आहेत. निवड समितीने टीमची निवड केली. त्यानंतर मला सांगितलं तुला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यानंतर कोणतंही बोलणं झालं नाही. टी 20चं कर्णधारपद मी स्वत: सोडलं. असंही यावेळी विराटने पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन डे सीरिज विराट कोहली खेळणार असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. तर रोहित शर्मासोबत कोणताही वाद किंवा नाराजी नाही. याबाबत होत असलेल्या चर्चा या अफवा असल्याचं कोहलीनं स्पष्ट केलं आहे.
निवड समितीने जेव्हा खेळाडूंच्या निवडीवर चर्चा केली तेव्हा फोन ठेवण्याआधी 5 मिनिटं मला वन डे फॉरमॅटचं कर्णधारपद काढून घेतल्याचं सांगण्यात आलं. मी निवड समितीचा निर्णय मान्य केला. निवड समितीमधील पाचही जणांचं एकमत असल्याने मी त्यांचा निर्णय स्वीकार केला असाही खुलासा विराट कोहलीनं केला आहे.
After discussion on Test team, chief selector told me I won't be ODI captain: Kohli
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2021
After discussion on Test team, chief selector told me I won't be ODI captain: Kohli
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2021
Will miss Rohit Sharma's abilities a lot during Test series against South Africa: Kohli
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2021
I am available for ODIs against South Africa, never asked BCCI for rest: India Test captain Virat Kohli
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2021
No problem between me and Rohit, have been clarifying for two years. I am tired now: Kohli
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2021