मुंबई : रोहित शर्माकडे वन डे सोबत टी 20 क्रिकेट फॉरमॅटचं नेतृत्व देण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि मॅनेजमेंटने चेतेश्वर पुजाराला डिच्चू दिला आहे. आता टीम इंडियामध्ये चेतेश्वर पुजाराच्या जागी कोणाला खेळवायचा याचा नवा पेच समोर आहे. यासाठी 3 धडाकेबाज फलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. या तिघांपैकी कोणाची वर्णी लागणार आणि हे तीन खेळाडू कोण आहेत जाणून घेऊया.
कसोटीतील खराब फॉर्ममुळे आधीच चेतेश्वर पुजारा सर्वांच्या नजरेत वाईट होता. तरीही त्याला न्यूझीलंड विरुद्ध संधी देण्यात आली होती. मात्र तिथेही विशेष कामगिरी न दिल्यानं टीम इंडियाला त्याचा मोठा फटका बसला आहे.
1. हनुमा विहारी
हनुमा विहारीचा विचार चेतेश्वर पुजाराच्या जागी बॅटिंग ऑर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी केला जाऊ शकतो. हनुमा विहारीने 13 कसोटी सामन्यात 684 धावा केल्या आहेत. त्याला कसोटी सामन्यासाठी खेळण्याची संधी कमी मिळाली. मात्र जेवढी मिळाली त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न हनुमानं केला.
2. सूर्यकुमार यादव
चेतेश्वर पुजाराच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. टी 20 सामन्यात सूर्यकुमारने तुफान फलंदाजी केली आहे. सध्या त्याला दुखापत झाली असली तरी तो लवकर मैदानात
3. शुबमन गिल
श्रीलंका विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची सीरिज 4 मार्च पासून सुरू होणार आहे. या सीरिजपूर्वी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजीसाठी उतरणार हे मॅनेजमेंटला ठरवावं लागणार आहे. हनुमा विहारी आणि सूर्यकुमारसोबत शुबमनचंही नाव चर्चेत आहे. तोही तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार आहे.