IND vs AUS: इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु झाली असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 2020 साली अॅडलेडमध्ये 36 ऑल आऊटचा बदला 91 असा घेतला आहे. पहिल्या सामन्यात सामन्यात टीम इंडियाने (Team India) बाजी मारत एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाला मात दिली. यासोबत टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी देखील घेतली आहे.
2020 साली ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्ऱॉफी रंगली होती. यावेळी अॅडिलेडमध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अवघ्या 36 रन्सवर ऑलआऊट झाली होती. विशेष म्हणजे यासंदर्भातील व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सिरीज सुरू होण्यापूर्वी शेअर केला होता. पण टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात शानदार प्रदर्शन करत सामना जिंकला.
ऑस्ट्रेलिया टीम पहिल्या डावात 177 रन्समध्ये ऑलआऊट झाली. तर कांगारू दुसऱ्या डाव 100 रन्सही करू शकले नाहीत आणि अवघ्या 91 रन्समध्ये ऑलआऊट झाले.
1. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टेस्ट करियरमधील 9वं शतक झळकावलं.
2. कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा एकमेव भारतीय ठरला आहे.
3. ऑस्ट्रेलियासाठी टेस्टमधील पहिल्या डावातील सर्वोत्तम आकडे
8/84 बॉब मॅसी विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स 1972
8/215 जेसन क्रेझा विरुद्ध इंडिया नागपूर 2008/09
7/124 टॉड मर्फी विरुद्ध इंडिया नागपूर 2022/23*
4. टेस्टमध्ये 5 विकेट्स घेणारा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन फिरकीपटू
22 वर्षे 87 दिवस टॉड मर्फी विरुद्ध इंडिया नागपूर 2022/23
22 वर्षे 360 दिवस जॉय पामर विरुद्ध इंग्लंड सिडनी 1881/82
23 वर्षे 5 दिवस चार्ल्स मॅकार्टनी विरुद्ध इंग्लंड लीड्स 1909
23 वर्षे 108 दिवस शेन वॉर्न विरुद्ध वेस्ट इंडिज मेलबर्न 1992/93
5. टेस्ट सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक 50+ रन्स आणि 5 विकेट्स
6 वेळा - रवींद्र जडेजा*
6 वेळा – रवी अश्विन
4 वेळा - कपिल देव
6. पहिलं टेस्ट शतक झळकावण्यासाठी भारतीय कर्णधारांनी खेळलेले डाव
1 - विजय हजारे
1 - सुनील गावस्कर
1- विराट कोहली
2 - डी वेंगसरकर
4 – रोहित शर्मा*
4 – एम अझरुद्दीन
4- कपिल देव
4 – अजिंक्य रहाणे
7. विरोधीटीम विरूद्ध सर्वाधिक कॅच घेणारा भारतीय फिल्डर
62 – राहुल द्रविड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
58 – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
58 - अझरुद्दीन विरुद्ध पाकिस्तान
54 – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
52 - विराट कोहली विरुद्ध इंग्लंड
8. IND विरूद्ध AUS टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट
111 अनिल कुंबळे
96 आर अश्विन*
95 हरभजन सिंग/नॅथन लियॉन
79 कपिल देव
9. टेस्ट डावात सर्वाधिक वेळा 100 किंवा त्याहून अधिक रन्स
61 - मुरलीधरन
57 – अनिल कुंबळे
43 – हरभजन सिंग
42 - नॅथन लिऑन*
40 – शेन वॉर्न
10. टेस्टमध्ये डावखुऱ्या फलंदाजानी केले रन्स
ऑस्ट्रेलिया : 9 डाव | 65 धावा | सरासरी 7.22
भारत: दुसरा डाव | 154 धावा | सरासरी 77
11. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा डाव विजय
डाव आणि 219 धावा कोलकाता 1997/98
हैदराबाद 2012/13 डाव आणि 135 धावा
डाव आणि 132 धावा नागपूर 2022/23*
12. भारताने मायदेशात गेल्या 43 टेस्टमध्ये 35 सामने जिंकले आहेत, फक्त 2 गमावले आहेत.
13. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 50 कॅच पूर्ण केले.
14. 2015 पासून भारतात टेस्टमध्ये 400+ धावा
18 वेळा – भारत*
4 वेळा - इंग्लंड
1 वेळ - ऑस्ट्रेलिया
1 वेळ - न्यूझीलंड
15. वॉर्नरला अश्विनने टेस्ट 11व्यांदा बाद केलंय
16. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या विजयात शतक झळकावणारा रोहित शर्मा एमएस धोनी आणि अजिंक्य रहाणेनंतरचा तिसरा भारतीय कर्णधार
17.या सामन्यात रविचंद्रन अश्विनने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 31व्यांदा 5 विकेट्स घेतल्या.
18.अश्विन हा टीम इंडियासाठी WTC इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे, त्याने आतापर्यंत 115 विकेट घेतल्या आहेत.
19. भारताच्या विजयात अश्विनच्या सर्वाधिक विकेट्स
489 - रवी अश्विन*
486 – अनिल कुंबळे
406 - हरभजन सिंग
366– रवींद्र जडेजा
349 - झहीर खान