फक्त २ रन्स करण्यासाठी भारताला लागली ४५ मिनिटं

 दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ९ विकेट्सनं जिंकली आहे.

Updated: Feb 4, 2018, 09:19 PM IST
फक्त २ रन्स करण्यासाठी भारताला लागली ४५ मिनिटं  title=

सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ९ विकेट्सनं जिंकली आहे. पण विजयासाठीचे शेवटचे २ रन्स बनवण्यासाठी भारताला तब्बल ४५ मिनिटं लागली. भारताचा स्कोअर ११७ रन्सवर असताना अंपायरनी लंच ब्रेक घ्यायचा निर्णय घेतल्यामुळे विजयाला उशीर झाला.

अंपायरनी घेतलेल्या लंच ब्रेकच्या निर्णयामुळे सोशल नेटवर्किंगवर त्यांची जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे. अंपायरनी भारतीय खेळाडूंना बँकेसारखी वागणूक दिली आहे. लंच नंतर या! असं ट्विट भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं केलं आहे.

 

दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या ११९ रन्सचं आव्हान भारतानं एक विकेट गमावून पार केलं. दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात एक धक्का बसला. १७ बॉल्समध्ये १५ रन्स करून रोहित शर्मा माघारी परतला. मॉर्ने मॉर्कलनं रोहित शर्माची विकेट घेतली. तर शिखर धवन ५१ रन्सवर नाबाद आणि विराट कोहली ४६ रन्सवर नाबाद राहिले. या विजयाबरोबरच भारतानं ६ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली आहे.

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. युझवेंद्र चहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. युझवेंद्र चहलनं ५, कुलदीप यादवनं ३ तर भुवनेश्वर कुमार-जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेचा जेपी डुमिनी आणि खाया झोंडोनं सर्वाधिक २५ रन्स केल्या.