Ind Vs Eng 1st T20i At Kolkata Eden Gardens: भारत आणि इंग्लंड संघ बुधवारी, 22 जानेवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर 5 सामन्यांची T20I मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. भारत T20 विश्वचषक चॅम्पियन बनल्यानंतर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यामुळे कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे आली.
भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टिकोनातून ही मालिका खास आहे. याचे कारण असे की या मालिकेत टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे विश्वचषक फायनलनंतर संघात पुनरागमन करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो पुनरागमन करत आहे. शमीच कमबॅक हे भारतीय संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या बॅटवरही चाहत्यांची नजर असेल.
आज, कोलकाता येथील सामन्यासाठी हवामान अनुकूल आहे. बुधवारी तेथील आकाश निरभ्र राहील. 22 जानेवारी रोजी शहराचे कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल त्यावेळी तापमान घसरण्यास सुरुवात होईल. तापमान घसरून किमान 16 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचेल. पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाहीये. आर्द्रतेचे प्रमाण 77 टक्क्यांपर्यंत राहील.
हे ही वाचा: 2 तास 37 मिनिटांचा 'तो' चित्रपट, ज्याने सर्व ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांवर फिरवले पाणी; याच्यापुढे 'महाराजा'ही झाला फेल
कोलकात्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी आणि वेग मिळतो. पण असे असूनही फलंदाजांना ही खेळपट्टी खूप आवडते. खेळ जसजसा पुढे जातो तसतसा तो हळू होतो. यावेळीही खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य असेल आणि नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल असे वाटत आहे.
Kolkata
Gearing for the #INDvENG T20I series opener #TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ocvsS4Y4R3
— BCCI (@BCCI) January 20, 2025
या मैदानावरील भारताच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत 7 T20I आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 जिंकले आहेत. 2011 मध्ये इंग्लंड संघाने भारताला हरवले होते तो भारताचा एकमेव इंग्लंडविरुद्धचा पराभव होता.