विराट-रोहितमधील 'नाराजीचा हा खेळ' टीम इंडियासाठी किती घातक?

टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) गोटात सर्व काही नीट सुरु आहे, असं सध्या तरी वाटत नाहीये.  

Updated: Dec 14, 2021, 04:40 PM IST
विराट-रोहितमधील 'नाराजीचा हा खेळ' टीम इंडियासाठी किती घातक? title=

मुंबई : टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) गोटात सर्व काही नीट सुरु आहे, असं सध्या तरी वाटत नाहीये. सोमवारी रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला. तर त्यानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याचं समजतंय. त्यामुळे या दोघांमध्ये खटकल्याचं म्हंटलं जातंय. दोघांना एकमेकांच्या नेतृत्वात खेळायचं नाहीये का, असा प्रश्न यासर्व घडामोडींवरुन उपस्थित होतोय. (india tour of south africa rohit sharma and virat kohli wont played in lead each other captaincy)  

नक्की झालंय काय?  

विराटने टी 20 वर्ल्ड कप 2021 नंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर विराटकडे असलेलं एकदिवसीय संघाचं नेतृत्व (Captaincy) काढलं. अशा प्रकारे रोहितला वनडे आणि टी 20 संघाची कॅप्टन्सी मिळाली. यामुळेच विराट आणि रोहित या दोघांमध्ये काही नीट नसल्याचं म्हंटलं जातंय. विराटकडे कसोटीचं कर्णधारपद कायम आहे. 

दोघांना एकमेकांविरुद्ध खेळायचं नाही का?

रोहित आणि विराट या दोघांना एकमेकांच्या नेतृत्वात खेळायचं नाहीये, असं चित्र दिसतंय. हे आम्ही नाही, तर गेल्या काही आठवड्यात जे घडलंय त्यावरुन म्हणतोय 

न्यूझीलंड टीम नुकतीच भारत दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यातील टी 20 मालिकेपासून रोहितने आपल्या कॅप्टन्सीची सुरुवात केली. या मालिकेत विराटला आणि अन्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

तसेच त्यानंतर झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा नव्हता. 

आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी रोहितला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळता येणार नाही. तर मंगळवारी 12 डिसेंबरला विराटही वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं समजतंय. विराटच्या मुलीचं वाढदिवस असल्याने त्याने माघार घेतल्याचं समजतंय.

रोहितला आधी थ्रोडाऊन स्पेशालिस्ट डी राघवेंद्रसोबत सराव करताना हाताला बॉल लागला. यामुळे त्याला दुखापत झाली होती.   झाल्याचं म्हंटलं जात होतं. मात्र त्यानंतर रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्याला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली, असं बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली. 

यामुळे टीम मॅनेजमेंट आणि विराट-रोहितमध्ये आलबेल नसल्याची चर्चा जोरात सुरु आहे. यामुळे टीम इंडियात नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय. 

आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार कोण? 

टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित या मालिकेतून बाहेर पडलाय. यामुळे आता रोहितची जबाबदारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.