मुंबई : टीम इंडिय़ाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटी्व्ह असल्याने इंग्लंड विरूद्ध टेस्ट सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहला दिली आहे, तसेच कर्णधारासोबत आता उपकर्णधार देखील बदलला आहे. त्यामुळे बुमराहच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.
भारतीय संघ शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराहला संघाचा कर्णधारपद देण्यात आले. पण या सामन्यात बीसीसीआय संघाच्या उपकर्णधारपदी कोणत्या खेळाडूची निवड करणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. ही गोष्ट आता जाहीर करण्यात आली आहे.
उपकर्णधारपदी 'हा' खेळाडू
भारतीय कर्णधार रोहित शर्माला शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. कारण गुरुवारी सकाळी केलेल्या चाचणीत रोहितची चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे आता त्याच्या मैदानात वापसीच्या शक्यता कमीच आहेत.
रोहित बाहेर गेल्याने आगामी कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंत टीम इंडियाचा कर्णधार असेल, असा खुलासा समितीकडून करण्यात आला आहे. दरम्यान पंतने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते, याशिवाय त्याला दीर्घकाळ आयपीएलचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभवही आहे. पंत उत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध झाले आहे.
भारतीय कसोटी संघ: जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मयंक अग्रवाल